Bharat Jodo Yatra : भारत जोडो यात्रा आज जम्मू-काश्मीरमध्ये पोहोचणार | पुढारी

Bharat Jodo Yatra : भारत जोडो यात्रा आज जम्मू-काश्मीरमध्ये पोहोचणार

पुढारी ऑनलाईन डेस्क : राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसची भारत जोडो यात्रा आज (दि.१९) जम्मू-काश्मीरमध्ये प्रवेश करेल. राज्याचे प्रवेशद्वार असलेल्या लखनपूर येथे सायंकाळी साडेसहाच्या सुमारास यात्रेचे तीन हजार मशालींसह भव्य स्वागत करण्यात येणार आहे. नॅशनल कॉन्फरन्सचे अध्य़क्ष डॉ. फारुक अब्दुल्ला, पीडीपी प्रमुख महबूबा मुफ्ती यांच्यासह राज्यातील इतर पक्षातील नेतेही सहभागी होणार आहेत. लखनपूरमध्ये  सुरक्षेची खबरदारी घेतली आहे. पोलीस आणि सुरक्षादलाने याची पूर्ण तयारी केली आहे. (Bharat Jodo Yatra )

भारत जोडो यात्रेमूळे काही वाहतूक मार्ग बदलण्यात आले आहेत. ही यात्रा जम्मू-काश्मीरमध्ये १२ दिवस राहील. ३० जानेवारीला या यात्रेचा समारोप श्रीनगरमध्ये होईल. ७ सप्टेंबरपासून तमिळनाडू राज्यातील कन्याकूमारी मधून सुरु झालेली ही यात्रा श्रीनगरमध्ये राहुल गांधी यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वज फडकवत समारोप केला जाईल. ही यात्रा आतापर्यंत तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, राजस्थान, दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि पंजाब राज्यातून आली आहे.

Bharat Jodo Yatra : जम्मू-काश्मीरमध्ये होईल ऐतिहासिक यात्रा-पाटील

एआयसीसीच्या जम्मू-काश्मीर प्रकरणाच्या प्रभारी आणि खासदार रजनी पाटील म्हणतात की, यात्रेच्या वेळापत्रकानुसार ही यात्रा कन्याकुमारी येथून पायी चालत असून यापुढेही चालणार आहे. यात्रेत देश-विदेशातील लोक सहभागी होणार आहेत. जम्मू-काश्मीरमधील ही अशा प्रकारची ऐतिहासिक भेट असेल. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली यात्रेला जनतेचा मोठा पाठिंबा मिळाला आहे. यावेळी राहुल गांधींसमोर जम्मू-काश्मीरचे स्थानिक ज्वलंत मुद्दे मांडणार आहेत, असे पाटील म्हणाल्या.

हेही वाचा

Back to top button