कंगाल पाकिस्तानला अमेरिका देणार मोठा झटका – MNNAदर्जा रद्द करण्यासाठी प्रस्ताव | पुढारी

कंगाल पाकिस्तानला अमेरिका देणार मोठा झटका - MNNAदर्जा रद्द करण्यासाठी प्रस्ताव

सीनेटमध्ये सदस्य प्रस्ताव दाखल | MNNA Status of Pakistan

पुढारी ऑनलाईन : आर्थिक संकट आणि अंतर्गत बंडाळी यांचा सामना करत असलेल्या पाकिस्तानवर आणखी एक संकट येऊ घातले आहे. पाकिस्तानला अमेरिकेने दिलेला गैर-नाटो मित्रराष्ट्राचा दर्जा संपुष्टात येण्याची चिन्हे आहे. अमेरिकेच्या सीनेटमध्ये पाकिस्तानचा हा दर्जा काढून घेण्यासाठीचा प्रस्ताव दाखल झाला आहे. MNNA Status of Pakistan

अमेरिकेने पाकिस्तानला Major Non-NATO Ally (MNNA)चा दर्जा दिलेला आहे. या दर्जामुळे पाकिस्तानला अमेरिकेकडून शस्त्रास्त्रे, कर्जपुरवठा. संशोधन, यासाठी सहज उपलब्ध होतात.

खासदार अँडी बिग्गज यांनी पाकिस्तानचा हा दर्जा काढून घेण्यासाठी ठराव दाखल केला आहे. अशा प्रकारचे ठरवा सहज मंजुर होत नसले तरी यातून अमेरिकेतील खासदारांच्या मनात पाकिस्तानबद्दलची प्रतिमा काय आहे, याची प्रचिती येते.

पाकिस्तानचा हा दर्जा चालू ठेवण्यासाठी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी पाकिस्तान दहशतवादाविरुद्ध कारवाई करत आहे, याचे प्रमाणपत्र द्यावे असे या ठरावात म्हटले आहे. हक्कानी नेटवर्कमधील दहशतवाद्यांवर कारवाई केली जात आहे, आणि पाकिस्तानची जमीन दहशतवादासाठी वापरली जात नाही, हे दाखवले जावे, असे या ठरावात म्हटले आहे.

याशिवाय पाकिस्तानकडून अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या हालचालींवरही चाप लावला जात आहे, याचे प्रमाणपत्र सादर केले जावे, असे या ठरावात म्हटले आहे.

हेही वाचा

Back to top button