Weather Update : राजधानी दिल्लीला हुडहुडी, किमान तापमान १. ४ अंश | पुढारी

Weather Update : राजधानी दिल्लीला हुडहुडी, किमान तापमान १. ४ अंश

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : राजधानी दिल्लीत सोमवारी (दि.१६) रोजी सकाळी थंडीची लाट पसरली असून तेथील सफदरजंग वेधशाळेत किमान १. ४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.  १ जानेवारी २०२१ पासून जानेवारी महिन्यातील हे  सर्वात कमी किमान तापमान ठरले आहे. ( Weather Update )

भारतीय हवामान विभागाचे (IMD) मुख्यालय लोधी रोडवर असून हवामान केंद्रात किमान तापमान १.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद केले आहे. आयएमडीने यापूर्वी १७-१८ जानेवारीपर्यंत दिल्लीत थंडीच्या लाट पसरणार असल्याने ऑरेंज अलर्ट जारी केला होता. IMD च्या आकडेवारीनुसार, दिल्लीत ५ ते ९ जानेवारी दरम्यान तीव्र थंडीची लाट पसरली होती, जी या महिन्यातील दुसऱ्या क्रमांकाची तीव्र थंडीची लाट आहे.

तर याच दरम्यान दिवसा सूर्यप्रकाशामुळे वातावरण आल्हाददायक राहील, मात्र, थंड वारे वाहतच राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. हवामान खात्याने संपूर्ण आठवडाभरासाठी येलो अलर्ट जारी केला आहे. मात्र, १९ जानेवारीपासून तापमानात आणखी काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. ( Weather Update )

नवी दिल्लीतील प्रादेशिक हवामान केंद्रानुसार, रविवारी (दि.१५) उत्तर-पश्चिम दिशेने येणाऱ्या थंडीच्या लाटेमुळे किमान तापमानात घट झाली आहे. रविवारी दिल्लीत कमाल तापमान १७.८ अंश सेल्सिअस नोंदवले गेले, जे न्यूनतम तापमानापेक्षा दोन अंशांनी कमी होते. त्याचवेळी, किमान तापमान ४.७ अंश सेल्सिअस नोंदवले गेले, जे न्यूनतम तापमानापेक्षा तीन अंशांनी कमी आहे. या महिन्यात आतापर्यंत ५० तास दाट धुक्याची नोंद झाली असून जी २०१९ नंतरची सर्वाधिक नोंद झाली आहे. मैदानी भागात किमान तापमान चार अंश सेल्सिअसपर्यंत खाली आल्यानंतर थंडीची लाट जाहीर केली जाते.

हेही वाचा : 

 

Back to top button