नाशिक : ड्रायपोर्टच्या पाहणी कार्यक्रमात खासदारांच्या उपस्थितीने रंगल्या चर्चा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
ड्रायपोर्टच्या पाहणी कार्यक्रमामध्ये खासदार हेमंत गोडसे यांची उपस्थिती हा चर्चेचा विषय झाला. जिल्ह्यात विधान परिषद पदवीधर मतदारसंघाची निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, त्याची आदर्श आचारसंहिता लागू आहे. आचारसंहितेत लोकप्रतिनिधी कोणत्याही विकासकामांच्या कार्यक्रमाला उपस्थितीत राहू शकत नाही. मात्र, ड्रायपोर्ट पाहणीसाठी खा. गोडसे उपस्थित राहिल्याने यावेळी उपस्थितांमध्ये चर्चा रंगल्या होत्या.
हेही वाचा:
- विमा कंपन्यांकडून नव्या वर्षात ‘पॉलिसी बदल’, जाणून घ्या काय होणार बदल
- सायबर गुन्हेगारांचा उपद्रव वाढला; राज्यात वर्षभरात १०० कोटींहून अधिक आर्थिक फसवणूक
- एनटीसी मिल वरील अकरा चाळींचा अखेर होणार पुनर्विकास