पुणे : जी २० परिषदेतून नारायण राणे यांचे विरोधकांना चिमटे, गालगुच्चे...! | पुढारी

पुणे : जी २० परिषदेतून नारायण राणे यांचे विरोधकांना चिमटे, गालगुच्चे...!

पुणे; पुढारी वृत्तसेवा : राजकारण व जी २० परिषद एकत्र करू नका, असा सल्ला देत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जी २० परिषदेत पत्रकारांशी बोलताना विरोधकांना चिमटे व गालगुच्चे घेतले. महाराष्ट्रात जी २० परिषद सुरू असून यातून राजकीय चर्चांना उधान आले आहे या प्रश्नावर ते म्हणाले की, आपल्या देशात चांगली लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलण्याचे स्वातंत्र्य आहे. त्यामुळे प्रत्येकजण पाहिजे ते बोलू शकतो. या राजकीय विधानाचा परिषदेशी काही संबंध नाही.

नुकतीच मकर संक्रांत झाली असलीतरी मी नेहमी गोडच बोलतो. राज्याच्या गृहमंत्र्यांनी वसुली करणाऱ्यांचा पुण्यात येऊन समाचार घेतला? या प्रश्नावर ते म्हणाले, कुठली वसुली, यावर पत्रकारांनी खंडणीखोराबद्दल म्हणतोय. यावर राणे म्हणाले, औद्योगिक क्षेत्रात होत असलेली खंडणी वसुली व त्या घटनांचा राज्य सरकार चांगल्या प्रकारे बंदोबस्त करीतच आहे. मी देखील यावर अधिक कृती करण्याबाबत सरकारला आठवण करून देईल.

कमिशनर सिंधुदुर्गातून ट्रेनिंग घेऊन आले….

पुण्यातील कुठला पहिला प्रोजेक्ट पाहुण्यांना दाखवणार? या प्रश्नाच्या उत्तरात राणे यांनी मिश्किल शैलीत सांगितले की, कमिशनर माझ्या सिंधुदुर्ग मधून ट्रेनिंग घेऊन आलेले आहेत. त्यामुळे पुण्यातील सर्व काही चांगलंच पाहुण्यांना दाखवणार. त्यावर पत्रकारांनी प्रतिप्रश्न केला की, पुण्यात मुख्य रस्ते देखील दररोज खोदले जातात, त्यामुळे शहराचा विकास कसा होणार?

यावर पुन्हा राणे म्हणाले की, अहो वाटतं इथल्या रस्ते, पायाभूत सुविधा चांगले आहेत. माणसं आणि पत्रकार देखील गोड आहेत, त्यावर एकच हशा पिकला. ते म्हणाले, चांगलं पाहिजे असेल तर खोदकाम करावंच लागतं. मुंबई नंतर पुण्याच्याच नंबर लागतो. पुणे ही औद्योगिक राजधानी म्हणून पाहिले जाते. लवकरच मुंबईनंतर पुणे ही देखील आर्थिक राजधानी म्हणून नाव रूपाला येऊ शकते

Back to top button