Weather Update : पुढचे चार दिवस गारठा वाढणार; २० जानेवारीपर्यंत वेस्टर्न डिस्टर्बन्सचा प्रभाव | पुढारी

Weather Update : पुढचे चार दिवस गारठा वाढणार; २० जानेवारीपर्यंत वेस्टर्न डिस्टर्बन्सचा प्रभाव

पुढारी ऑनलाईन : पुढचे चार दिवस भारतात काही भागत गारठा वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे हवामानाची (Weather Update) सद्यस्थिती निर्माण झाली आहे. २० जानेवारीपर्यंत हवामानावर वेस्टर्न डिस्टर्बन्स अॅक्टिव्ह असल्याने उत्तर भारतात थंडीचा हा प्रभाव जाणवणार असल्याचेही हवामान विभागाने म्हटले आहे.

पुढच्या दोन दिवसात उत्तर भारतातील तापमान ४ ते ६ अंश सेल्सिअस, मध्यप्रदेशातील ३ ते ५ अंश सेल्सिअस, भारतातील पूर्वेकडील भागात तापमान २ ते ४ अंश सेल्सिअस, गुजरातमध्ये ३ ते ४ अंश सेल्सिअसपर्यंत घसरणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. मुख्यत्वे उत्तर भारतातील दिल्ली, राजस्थान, पंजाब, हरियाणा, छत्तीसगढ या राज्यात १५ ते १८ जानेवारी दरम्यान थंडी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने दर्शवली आहे. तसेच हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, संपूर्ण कर्नाटकात पुढच्या चार दिवसात थंडी वाढणार (Weather Update) असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने दिला आहे.

पुढच्या पाच दिवसात थंडीबरोबरच धुकेही मोठ्या प्रमाणात असण्याची शक्यता हवामान (Weather Update) विभागाने वर्तवली आहे. पंजाब, हरियाणा, छत्तीसगढ, दिल्ली, उत्तरप्रदेश या भागात सकाळ आणि संध्याकाळी दाट धुक्याची चादर पसरणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. याचबरोबर जम्मू काश्मीर, हिमाचलप्रदेश आणि उत्तराखंडमध्येही धुके जाणवणार असल्याचे हवमान विभागाने म्हटले आहे.

हेही वाचा:

Back to top button