Delhi Air Quality Index : दिल्लीतील वायू गुणवत्ता निर्देशांक अत्यंत खराब श्रेणीत; थंडीसह प्रदूषित हवेचा तडाखा

Delhi Air Quality Index : दिल्लीतील वायू गुणवत्ता निर्देशांक अत्यंत खराब श्रेणीत; थंडीसह प्रदूषित हवेचा तडाखा
Published on
Updated on

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : राजधानी दिल्लीतील वायू गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) (Delhi Air Quality Index)  अत्यंत खराब श्रेणीत पोहचला आहे. दिल्लीकरांना त्यामुळे कडाक्याच्या थंडीसह प्रदूषणाचा सामना करावा लागत आहे. सिस्टम फॉर एअर क्वालिटी अँड वेदर फॉरकास्टिंग अँड रिसर्चच्या (सफर) आकडेवारीनुसार दिल्ली विद्यापीठ परिसरातील एक्यूआय ३५७ नोंदवण्यात आला. तर दिल्लीच्या जवळपासच्या परिसरातील एक्यूआय ३३७, मथुरा रोड ३४९ तसेच लोधी रोड परिसराचा एक्यूआय ३२७ नोंदवण्यात आला.

शनिवारी सकाळी दिल्लीत ११.६ अंश Dसेल्सियस तापमानाची (Delhi Air Quality Index)  नोंद घेण्यात आली. हवेतील आर्द्रतेचे प्रमाण ९७ टक्के नोंदवण्यात आले. दक्षिण-पश्चिम हवा ११.१ किलोमीटर ताशी वेगाने वाहत असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. वातावरणातील हवेचा वेग १२ ते १५ किलोमीटर असल्याने प्रदूषणाचे छोटे कण हवेत स्थिरावल्याने प्रदूषणात वाढ झाली आहे. पुढील तीन दिवसांपर्यंत प्रदूषणाची पाताळी अत्यंत खराब श्रेणीतच राहील, असा अंदाज सफर इंडियाने वर्तवला आहे.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (सीपीसीबी) जारी केलेल्या आकडेवारीनुसार शुक्रवारी दिल्लीचा एक्यूआय ३७८ या अत्यंत खराब श्रेणीत नोंदवण्यात आला. गुरूवारी एक्यूआय ३७१ नोंदवण्यात आला होता. आयटीओ परिसरातील एक्यूआय सर्वाधिक ४४६ नोंदवण्यात आला. तर, राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील एनसीआर मधील फरीदाबाद ३१९, गाझियाबाद २९३, ग्रेटर नोएडा ३३२, गुरूग्राम ३११ तसेच नोएडाचा एक्यूआय ३२४ नोंदवण्यात आला.

हेही वाचलंत का ? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news