Bharat Jodo Yatra : राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला स्थगिती | पुढारी

Bharat Jodo Yatra : राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला स्थगिती

पुढारी ऑनलाईन : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासोबत भारत जोडो यात्रेत सहभागी असलेले जालंधरचे काँग्रेस खासदार संतोख सिंह चौधरी यांचे निधन झाले. या कारणास्तव पुढील २४ तास भारत जोडो यात्रेला स्थगिती देण्यात आल्याची माहिती काँग्रेसचे प्रवक्ते खासदार जयराम रमेश यांनी दिली आहे. तसेच दरम्यान राहुल गांधी यांची होणारी पत्रकार परिषेदसुद्धा रद्द करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

काँग्रेस नेते राहुल गांधींसोबत चालत असताना त्यांच्या हृदयाचे ठोके अचानक वाढले. त्यामुळे राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा तत्काळ थांबवली. रुग्णवाहिकेतून त्यांना फगवाडातील विर्क रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरनी त्यांना मृत घोषित केले. राहुल गांधींची यात्रा सकाळी ७ वाजल्यापासून लुधियानातील लोडोवालपासून सुरू झाली होती.

ही यात्रा आज (दि.१४) सकाळी १० वाजता जालंधरमधील गोराया येथे पोहोचणार होती. दुपारच्या जेवणासाठी येथे थांबणार होते. त्यानंतर दुपारी ३ वाजता पुन्हा यात्रा सुरू होणार होती. यात्रा सायंकाळी ६ वाजता फगवाडातील बस स्टेशन जवळ थांबणार होती. मात्र ही यात्रा आता उद्या दुपारी जालंधर येथील खालसा कॉलेज ग्राउंडवरून पुन्हा सुरू होणार असल्याचेही खासदार जयराम रमेश यांनी सांगितले आहे.

हेही वाचा:

Back to top button