

पुढारी ऑनलाइन डेस्क : Bharat Jodo Yatra : काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले मला लग्नासाठी अशी मुलगी हवी जीच्यामध्ये माझी आई सोनिया गांधी आणि आजी इंदिरा गांधी या दोघींचे गुण असतील. अशा मुलीला मी माझी जीवनसाथी बनवण्यासाठी प्राथमिकता देईन.
Bharat Jodo Yatra : भारत जोडो यात्रे दरम्यान एका यु ट्यूब चॅनलला राहुल गांधींनी मुलाखत दिली. त्यावेळी राहुल गांधी यांना आयुष्यात जीवनसाथी सोबत सेटलडाऊन कधी होणार, असा प्रश्न विचारला होता. यावेळी उत्तर देताना राहुल गांधी यांनी याविषयीच्या आपल्या भावना बोलून दाखवल्या.
राहुल गांधींना मुलाखती दरम्यान असे विचारण्यात आले होते, तुम्हाला आयुष्यात जोडीदार म्हणून कशी स्त्री आवडेल. यावर राहुल गांधी यांनी हसत हसत उत्तर दिले. राहुल म्हणाले, हा खूपच छान प्रश्न आहे. मी स्त्रीला प्राधान्य देईन… मला हरकत नाही… तिच्यात गुण आहेत. पण, माझ्या आईच्या आणि आजीच्या गुणांचे मिश्रण चांगले आहे."
Bharat Jodo Yatra : यावेळी राहुल गांधी यांनी इंदिरा गांधी यांच्याबद्दल आवर्जून उल्लेख केला. माझी आजी आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे वर्णन करताना राहुल म्हणाले इंदिरा गांधी हे माझ्या आयुष्यातील प्रेम आणि माझी दुसरी आई आहे.
Bharat Jodo Yatra : पप्पू बॉय म्हटले तर राग येतो का?
विरोधक 'पप्पू' नावाने संबोधित करतात यावर तुम्हाला कसं वाटतं, या प्रश्नावर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी ( Rahul Gandhi ) यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. भारत जोडो यात्रेवेळी एका मुलाखतीमध्ये राहुल गांधी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. राहुल गांधी यांनी काय म्हटले आहे. याची सविस्तर बातमी वाचा खालील लिंक वर…
या व्यतिरिक्त राहुल गांधी यांनी मोटार बाईक, कार आदि अनेक मुद्द्यांवर प्रश्न विचारण्यात आले. त्यावर राहुल गांधी यांनी दिलखुलास उत्तरे दिली.
हे ही वाचा :