Bharat Jodo Yatra : ....यासाठी भारत जोडो यात्रेत सहभागी झालो - कमल हसन | पुढारी

Bharat Jodo Yatra : ....यासाठी भारत जोडो यात्रेत सहभागी झालो - कमल हसन

पुढारी ऑनलाइन डेस्क : Bharat Jodo Yatra : कोणत्याही युतीच्या उद्देशाने नाही तर राहुल गांधींच्या उद्देशाने प्रेरित होऊन, भारत जोडो यात्रेत सहभागी झालो. मी भारतीय होण्याचे कर्तव्य पार पाडले, असे दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता कमल हसन यांनी स्पष्ट केले.

Bharat Jodo Yatra : अभिनेता कमल हसन हे शनिवारी भारत जोडो यात्रेत काही वेळासाठी सहभागी झाले. ते दिल्लीतील आईटीओ चौकातून राहुल गांधींसोबत चालत लालकिल्ल्यावर पोहोचले. राहुल गांधींसोबत चालताना त्यांची अनेक छायाचित्रे प्रसिद्ध झाली. त्यामुळे कमल हसन काँग्रेसमध्ये सहभागी होणार का अशी चर्चा रंगली होती. मात्र, लाल किल्ल्यावर पोहोचताच त्यांनी तेथील मंचावरून सर्व सहभागी सहका-यांना उद्देशून संबोधित केले.

Bharat Jodo Yatra : कमल हसन यांनी स्पष्ट केले की कोणत्याही प्रकारच्या राजीकय गठबंधनासाठी भारत जोडो यात्रेत सहभागी झोलेलो नाही. तर राहुल गांधी यांच्या भारत जोडोच्या उद्देशाने प्रेरित होऊन त्यांच्या उद्देशासाठी या मंचावर आलो आहे.

Bharat Jodo Yatra : तसेच यात्रेत सहभागी होण्यापूर्वी कमल हसन यांनी एक व्हिडिओ शेयर करत माहिती दिली की त्यांना राहुल गांधी यांनी एक राजनेता म्हणून नव्हे तर एक नागरिक म्हणून यात्रेत सामील होण्यासाठी आमंत्रण पाठवले होते. त्यामुळे आज ते दिल्ली येथे भारत जोडो यात्रेत आले आहे.

हे ही वाचा :

Chalapathi Rao : ज्येष्ठ तेलुगू अभिनेते चलपती राव यांचे निधन

राष्ट्रवादीचे ‘आनंद परांजपे’ यांना अटक होण्याची शक्यता : जितेंद्र आव्हाडांचे ट्विट

Back to top button