Joshimath Isro : जोशीमठमधील जमीन १२ दिवसात ५.४ से.मी खचली; इस्रोच्या छायाचित्रातून गंभीर भूस्खलनाचा इशारा | पुढारी

Joshimath Isro : जोशीमठमधील जमीन १२ दिवसात ५.४ से.मी खचली; इस्रोच्या छायाचित्रातून गंभीर भूस्खलनाचा इशारा

पुढारी ऑनलाईन डेस्क: Joshimath Isro : नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटर ऑफ इंडियन स्पेस रिसर्चने (इस्रो) जोशीमठाच्या उपग्रह प्रतिमा प्रसिद्ध केल्या आहेत. यावरून १२ दिवसांत ५.४ सेंटीमीटर जमीन खचली असल्याची नोंद करण्यात आली आहे. ईस्रोकडून समोर आलेला हा अहवाल खूपच धक्कादायक आहे. कारण यापूर्वी एप्रिल ते नोव्हेंबर 2022 या सात महिन्याच्या काळात केवळ ९ सेमी जमीन खचलेली नोंद करण्यात आली आहे.

जोशीमठ शहर किती वेगाने बुडत आहे, हे भारतीय अंतराळ संशोधन केंद्राने (इस्रो) जोशीमठची उपग्रह प्रतिमा प्रसिद्ध केली आहे. इस्रोशी संबंधित नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटरने प्रथमच असे चित्र प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार, गेल्या १२ दिवसांत जोशीमठची जमीन 5.4 सेमी ने खचल्याचे स्पष्ट केले आहे. सध्याच्या या परिस्थितीमध्ये भूस्खलनात झपाट्याने वाढ होत असल्याचा इशारा इस्रोने दिला आहे. भविष्यात हे अधिक वेगाने होण्याची शक्यताही इस्रोकडून वर्तवण्यात येत आहे.

Joshimath Isro : आता भूकंपाचाही धोका

देवभूमीच्या डोंगराळ भागात संकटाचे ढग दिवसेंदिवस दाटतच चालले आहेत. जोशीमठमध्ये जमीन खचण्याचे प्रकरण अजूनही मोठे संकट म्हणून उभे असतानाच उत्तरकाशी येथून 2.9 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाल्याचे वृत्त आहे. आतापर्यंत कोणत्याही नुकसानीचे वृत्त नाही, मात्र जोशीमठची स्थिती पाहता भूकंपाचा थोडासा हादराही मोठा विध्वंस घडवू शकतो, अशी भीती येथील अधिकारी आणि नागरिकांना वाटत आहे. या घटनांबद्दल प्रशासनातील उच्चपदस्थ अधिकारीही सतर्क आहेत.

हेही वाचा:

Back to top button