

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : जोशीमठ येथे जमीन धसल्यामुळे शेकडो घरांना धोका निर्माण झाला आहे. प्रभावित लोकांना सुरक्षित स्थळी हलविले जात आहे, अशी माहिती उत्तराखंड सरकारकडून गुरुवारी दिल्ली उच्च न्यायालयाला देण्यात आली. लोकांना पुनर्वसन पॅकेज दिले जाणार असून त्यावर काम सुरु असल्याचेही राज्य सरकारकडून सांगण्यात आले.
जोशीमठमध्ये कोणतीही दुर्घटना झाली तर तात्काळ प्रतिसाद देता यावा, याकरिता राष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती प्रतिसाद दल तसेच राज्य नैसर्गिक आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत, असे उत्तराखंड सरकारकडून मुख्य न्यायमूर्ती सतीशचंद्र शर्मा आणि न्यायमूर्ती सुब्रम्हण्यम प्रसाद यांच्या खंडपीठाला सांगण्यात आले.
हेही वाचा :