दिल्लीहून गोव्याला जाणाऱ्या विमानात परदेशी नागरिकाचे एअर होस्टेससोबत गैरवर्तन | Misbehave To Air Hostess

दिल्लीहून गोव्याला जाणाऱ्या विमानात परदेशी नागरिकाचे एअर होस्टेससोबत गैरवर्तन | Misbehave To Air Hostess
Published on
Updated on

पणजी; पुढारी ऑनलाईन : गो फर्स्ट एअर या विमान कंपनीच्या विमानात एअर होस्टेससोबत गैरवर्तन केल्याची घटना समोर आली आहे. 5 जानेवारी रोजी दिल्लीहून गोव्याला जाणाऱ्या विमानात एका परदेशी प्रवाशाने एअर होस्टेससोबत गैरवर्तन केले. एका परदेशी प्रवाशाने एअर होस्टेसला जवळ बसण्यास सांगितले आणि अश्लील भाषा वापरली. (Misbehave To Air Hostess)

गोव्यातील नवीन विमानतळावर विमान कंपनीने या प्रकरणात त्या परदेशी प्रवाशाला सीआयएसएफकडे (CISF) सुपूर्द केले. एअरलाइन्सने याप्रकरणी डीजीसीएलाही (DGCA) कळवले आहे. या प्रकरणात पुढे काय झाले हे अद्याप कळू शकलेले नाही. (Misbehave To Air Hostess)

गोव्यात नवीन विमानतळ सुरू झाल्याच्या दिवशी ही घटना घडली. नोव्हेंबरमध्ये न्यूयॉर्कहून नवी दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात एका महिला सहप्रवाशावर लघुशंका केल्याचा आरोप असलेल्या एका व्यक्तीला तुरुंगात पाठवण्यात आले त्याच दिवशी ही बाब उघडकीस आली. (Misbehave To Air Hostess)

एअर इंडियाने या आठवड्यात पोलिसात तक्रार दाखल केली. मिश्रावर ३० दिवसांसाठी विमान प्रवास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. यावर सोशल मीडिया यूजर्सनी नाराजी व्यक्त करत इतके पुरेसे नसल्याचे सांगितले. पोलिसांनी शुक्रवारी रात्री शंकर मिश्राला बंगळुरू येथून अटक केली.

अधिक वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news