कंझावला प्रकरण : अपघातातून बचावलेली तरुणी निघाली ड्रग पेडलर | kanjhawala case

कंझावला प्रकरण : अपघातातून बचावलेली तरुणी निघाली ड्रग पेडलर | kanjhawala case
Published on
Updated on

दिल्ली; पुढारी ऑनलाईन : दिल्लीतील कंझावला प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. दरम्यान, अंजलीची मैत्रिण निधी पूर्वी गांजा सप्लाय करायची, असा खुलासा दिल्ली पोलिसांनी केला आहे. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निधीला 2020 मध्ये अमली पदार्थांच्या तस्करीप्रकरणी अटक करण्यात आली होती. तिच्याकडून 10 किलो अवैध गांजा जप्त करण्यात आला. निधीला 6 डिसेंबर 2020 रोजी आग्रा कँट स्टेशनवर अटक करण्यात आली होती. नुकतेच ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री दिल्लीतील अंजली या तरुणीचा अपघात झाला. या अपघातात अंजलीला मोठा चारचाकी गाडीने फरफटत नेले व तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघाता वेळी अंजलीची मैत्रिण निधी ही स्कुटरवर मागे बसली होती. या अपघातात निधी थोडेसे लागले होते व या सर्व घटनाक्रमाची ती साक्षीदार आहे. (kanjhawala case)

काय आहे संपूर्ण प्रकरण? (kanjhawala case)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निधीला आग्रा रेल्वे स्थानकावर पकडण्यात आले. ती तेलंगणातून ट्रेनमधून ड्रग्ज आणत होती. निधीसोबत समीर आणि रवी नावाच्या दोन तरुणांनाही पकडण्यात आले होते. निधी कांजवाला प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहे. कांजवाला प्रकरणात दिल्ली पोलिसांनी निधीला अटक करण्यात आली नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

सध्या जामिनावर बाहेर आहे

पोलिसांनी सांगितले की निधीला डिसेंबर 2020 मध्ये अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थ कायदा, (1985) अंतर्गत अटक करण्यात आली होती. ती सध्या जामिनावर बाहेर आहे. निधी तेलंगणातून 10 किलो ड्रग्ज आणत होती. शुक्रवारी दिल्ली पोलिसांनी निधीला चौकशीसाठी तिच्या घरातून ताब्यात घेतले होते. अंजलीच्या कुटुंबीयांनी निधीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. निधी पूर्णपणे खोटे बोलत असल्याचे अंजलीच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे. (kanjhawala case)

निधी संशयाच्या फेऱ्यात

अंजलीच्या मृत्यूनंतर तिची मैत्रीण निधी आता संशयाच्या फेऱ्यात अडकली आहे. अंजलीच्या कुटुंबियांचा आरोप आहे की, अपघातानंतर तिने पोलिसांना का कळवले नाही? दुसरीकडे निधीचे म्हणणे आहे की, अपघातानंतर ती खूप घाबरली होती, त्यामुळे तिने कोणालाही काहीही सांगितले नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. आतापर्यंत कांजावला प्रकरणात 7 जणांना अटक करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत निधीबाबत पोलिसांनी धक्कादायक खुलासा केला आहे.

अधिक वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news