फेरीवाल्यांना मायक्रो-क्रेडिट सुविधा उपलब्ध करवून देण्याचा केंद्राचा मानस : दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव | पुढारी

फेरीवाल्यांना मायक्रो-क्रेडिट सुविधा उपलब्ध करवून देण्याचा केंद्राचा मानस : दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : केंद्र सरकार २०२३ मध्ये फेरीवाल्यांना ३ ते ५ हजार रुपयांपर्यंत मायक्रो-क्रेडिट सुविधा उपलब्ध करून  देण्यावर लक्ष केंद्रीत करीत आहे. केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली.

डिजिटल इंडिया अवार्ड्स समारंभादरम्यान बोलतांना वैष्णव म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक नागरिकाला डिजिटल स्वरुपात जोडण्यासाठी देशातील प्रत्येक भागात 4 जी तसेच 5 जी सेवा देण्यासाठी जवळपास ५२ हजार कोटी रुपये हस्तांतरित केले आहेत.

२०२३ मध्ये फेरीवाल्यांच्या छोट्या गरजांची पुर्तता करण्यासाठी सुलभपद्धतीने क्रेडिट सुविधा देण्यावर सरकारचा भर आहे. स्वदेशी तंत्रज्ञानाने विकासित 4 जी तसेच 5 जी तंत्रज्ञान विकसित होतांना यंदा देश बघेल. तंत्रज्ञान क्षेत्रात भारताला आत्मनिर्भर करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दृष्टिकोनातून देशात एक इलेकट्रॉनिक चीप निर्माण संयंत्र स्थापन करण्यात येईल,असेही वैष्णव म्हणाले.

पीएम स्ट्रीट वेंडर्स आत्मनिर्भर निधी (स्वनिधी) योजनेला मायक्रो क्रेडिट सुविधेस्वरुपात जून-२०२० मध्ये सुरू करण्यात आले होते. कोरोना महारोगराईमुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी स्ट्रीट वेंडर्सला सशक्त करण्याचा उद्देश योजनेचा आहे. पीएम स्वनिधीच्या माध्यमातून फेरीवाल्यांना परवडणारी तारण-मुक्त कर्जे दिले जातात.

हेही वाचा :

Back to top button