Cold Wave : उत्तर भारतात कडाक्याच्या थंडीने गाठला उच्चांक; विमानांसह रेल्वे सेवेवर परिणाम | पुढारी

Cold Wave : उत्तर भारतात कडाक्याच्या थंडीने गाठला उच्चांक; विमानांसह रेल्वे सेवेवर परिणाम

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : जानेवारीच्या सुरुवातीलाच देशभरात कडाक्याची थंडी पडली आहे. मध्यप्रदेश 22 वर्ष आणि पंजाब आणि हरियाणामध्ये अनुक्रमे 11 आणि 11 वर्षातील थंडीने विक्रम मोडला आहे. संपूर्ण उत्तर भारतात ‘कोल्ड वेव्ह अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशातील 15 जिल्ह्यातील थंडीचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. (Cold Wave)

जम्मू-काश्मीर आणि हिमाचलप्रदेशात येत्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टी होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे उत्तर भारतात कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता आहे. देशाची राजधानी दिल्लीत तर खूपच थंडी पडली आहे. शहरातील तापमान खूपच घसरले असून हवा खूपच प्रदूषित झाली आहे. दिल्लीत बुधवारी किमान तापमान 8 तर कमाल तापमान 17 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. शीतलहरीमुळे तापमानाचा पारा खाली आला आहे. उत्तर भारतात विमानांसह रेल्वे गाड्या उशिराने धावत आहेत. (Cold Wave)

हिमाचल प्रदेशात बर्फाची चादर

हिमाचल प्रदेशात अनेक ठिकाणचे तापमान शून्य अंशाखाली गेले असून थंडी आणखी वाढतच आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होत असल्याने अनेक रस्ते बंद झाले आहे. बर्फाचे खच पडत असल्याने नागरिकांना बाहेर पडणे अवघड झाले आहे. सर्वत्र बर्फाची चादर पसरली आहे.

अधिक वाचा :

Back to top button