काबूल; पुढारी ऑनलाईन : अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये स्फोटांची मालिका सुरुच आहे. रविवारी (दि.१) येथे लष्करी विमानतळाच्या गेटवर मोठा स्फोट घडवून आणला. यात १० लोक ठार झाले होते. यानंतर येथे स्फोटांची मालिका सुरुच असल्याचे सांगण्यात येत आहे. एनआयने टोलो न्यूजच्या माध्यमातून एक ट्वीट केले आहे ज्यामध्ये येथे बुधवारी आणखी एक स्फोट झाल्याची माहिती समोर येत आहे. अद्याप स्थानिक माध्यमांनी याबाबत कोणतीही बातमी दिलेली नाही. अथवा अफगाणिस्तान मधून सुद्धा अशी अधिकृत माहिती समोर आलेली नाही. (Afghanistan Blasts)
अफगानिस्तानमध्ये रविवारी (दि. १) लष्काराच्या विमानतळाच्या गेटवर मोठा स्फोट घडवून आणण्यात आला. या भीषण स्फोटात स्फोटात १० लोकांचा मृत्यू झाला तर आठ जण गंभीर जखमी झाले. या हल्ल्यानंतर मोठी जीवित व वित्तहाणी झाली होती. या हल्ल्याबाबत तालिबानच्या गृह मंत्रालयांचे प्रवक्ते अब्दुल नफी तकूर यांनी सांगितले की, काबूलमधील लष्करी विमानतळाच्या मुख्य गेटजवळ उपस्थित असलेले लोक या स्फोटात जखमी झाले आहेत.
अफगाणिस्तानमध्ये हल्ल्यांची मालिका
गेल्या महिन्यात काबूलमध्ये एका चिनी हॉटेलला लक्ष्य करण्यात आले होते. ही सर्व परिस्थिती पाहता अफगाणिस्तानात अशा हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. तसेच बुधवारी झालेल्या हल्ल्याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. शिवाय तालिबान सरकारकडून कोणतीही प्रतिक्रिया नाही.
हेही वाचा