योगी आदित्यनाथ यांनी घेतली राज्यपाल कोश्यारी यांची भेट | पुढारी

योगी आदित्यनाथ यांनी घेतली राज्यपाल कोश्यारी यांची भेट

पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे सध्या मुंबई दौऱ्यावर आहेत. योगी आदित्यनाथ मुंबई दौऱ्यावर असताना त्यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली. महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर योगी आदित्यनाथ पहिल्यांदाच महाराष्ट्रात आले आहेत.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उत्तरप्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक व गोरखपूरचे खासदार रवि किशन देखील उपस्थित होते. राज्यपालांनी योगी आदित्यनाथ यांना छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती भेट दिली. राज्यपालांनी योगी आदित्यनाथ यांची शिवाजी महाराजांची मूर्ती भेट देऊन स्वागत केले.

हेही वाचंलत का?

Back to top button