काँग्रेसच्‍या पंतप्रधान उमदेवाराबाबत नितीशकुमारांची स्‍पष्‍टोक्‍ती, "राहुल गांधींचे नाव..." | पुढारी

काँग्रेसच्‍या पंतप्रधान उमदेवाराबाबत नितीशकुमारांची स्‍पष्‍टोक्‍ती, "राहुल गांधींचे नाव..."

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : काँग्रेसने पंतप्रधानपदाचे उमेदवार म्‍हणुन राहुल गांधी यांचे नाव जाहीर केले तर मला कोणतीही अडचण नाही. आपण सर्वोच्‍च पदासाठी दावेदारच नाही, असे संयुक्‍त जनता दलाचे नेते व बिहारचे मुख्‍यमंत्री नितीशकुमार यांनी स्‍पष्‍ट केले आहे. केंद्रातील सत्ताधारी पक्षाविरोधात सर्व समविचारी पक्षांमध्‍ये एकमत व्‍हावे, अशी अपेक्षाही त्‍यांनी व्‍यक्‍त केली.

आगामी २०२४ च्‍या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार राहुल गांधी असतील, असे पक्षाचे ज्‍येष्‍ठ नेते व मध्‍य प्रदेशचे माजी मुख्‍यमंत्री कमलनाथ यांनी म्‍हटले होते. याबाबत ‘पीटीआय’शी बोलताना नितीशकुमार  म्‍हणाले, “पंतप्रधानपदाच्‍या उमेदवाराबाबत सर्व पक्षांशी विचारविनिमय करून निर्णय घेणे ही काँग्रेस पक्षाची जबाबदारी आहे. सध्या ते भारत जोड यात्रेत व्यस्त असल्याचे दिसत आहे. आम्ही पुढील घडामोडींची वाट पाहत आहोत,”

हेही वाचा : 

 

 

Back to top button