Earthquake In Bay of Bengal : नव्या वर्षात भूकंपाचा आणखी एक धक्का, बंगालच्या खाडीत 4.5 तीव्रतेचा भूकंप | पुढारी

Earthquake In Bay of Bengal : नव्या वर्षात भूकंपाचा आणखी एक धक्का, बंगालच्या खाडीत 4.5 तीव्रतेचा भूकंप

पुढारी ऑनलाइन डेस्क : राजधानी दिल्लीनंतर आता बंगालच्या खाडीतही भूकंपाचे सौम्य धक्के बसले आहेत. भूकंप विज्ञानाच्या राष्ट्रीय केंद्राच्या माहितीनुसार (National Center for Seismology)  ४.५ तीव्रतेचा हा भूकंप होता. भूकंपामुळे कोणत्याही स्वरुपाचं नूकसान झाल्याची माहिती अद्याप मिळालेली नाही. हा भूकंप आज (दि.१) सकाळी ११ च्या सुमारास झाला. (Earthquake In Bay of Bengal) याबाबत भूकंप विज्ञानाच्या राष्ट्रीय केंद्राने ट्विट करत माहिती दिली आहे.

बंगालच्या खाडीत भूकंप येण्यापूर्वी आज सकाळी (दि.१) दिल्ली आणि जवळपासच्या परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले. दिल्लीकरांची नवीन वर्षाची पहाट भूकंपाच्या धक्क्यांनी सुरू झाली. 31 डिसेंबरच्या मध्यरात्रीनंतर 1 जानेवारीच्या पहाटे 1.19. मिनिटांनी दिल्ली आणि जवळपासच्या परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले. 3.8 तीव्रतेचा हा भूकंप होता. याचे केंद्रस्थान हरियाणाच्या झज्जर येथे नोंदवले गेले, अशी माहिती भूकंप विज्ञानाच्या राष्ट्रीय केंद्राकडून (National Center for Seismology) देण्यात आली आहे. एनसीएसने ट्विट करून याची माहिती दिली आहे.

हेही वाचा

Back to top button