Corona Update : देशातील कोरोना सक्रिय रुग्णसंख्येत घट | पुढारी

Corona Update : देशातील कोरोना सक्रिय रुग्णसंख्येत घट

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : सरत्या चोवीस तासात कोरोना रुग्ण संख्येत 265 ने वाढ  (Corona Update) झाली असल्याची माहिती आरोग्य खात्याकडून रविवारी देण्यात आली. कोरोनामधून बरे झालेल्या रूग्णांची संख्या वाढून 4 कोटी 41 लाख 45 हजार 238 वर पोहोचली आहे. तर रिकव्हरी दर 98.80 टक्क्यांच्या आसपास स्थिर आहे.

मागील चोवीस तासात सक्रिय रुग्णांच्या संख्येत (Corona Update) लक्षणीय म्हणजे 947 ने घट झाली आहे. थोडक्यात सक्रिय रुग्ण संख्या 3653 वरून 2706 वर आली आहे. एकूण रुग्णांच्या तुलनेत सक्रिय रुग्ण संख्येची टक्केवारी 0.01 टक्के इतकी आहे. कोरोनामुळे बळी पडलेल्या लोकांची संख्या आता 5 लाख 30 हजार 702 वर गेली आहे. सरत्या चोवीस तासात कोरोनाने तीन लोकांचा बळी घेतला. बळींपैकी दोनजण केरळमधले असून एकजण कर्नाटकमधला आहे. दरम्यान कोरोना नियंत्रणासाठी आतापर्यंत 220.10 कोटी डोसेस देण्यात आले असल्याचे आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button