LPG Price : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका; व्यावसायिक गॅस सिलिंडर २५ रुपयांनी महागला | पुढारी

LPG Price : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका; व्यावसायिक गॅस सिलिंडर २५ रुपयांनी महागला

पुढारी ऑनलाईन डेस्क : नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी 19 किलो वजनाच्या व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडर दरात 25 रुपयांनी वाढ केली आहे. ताज्या दरवाढीनंतर दिल्लीतील गॅस सिलेंडरचे दर 1768 रुपयांवर गेले आहेत. दुसरीकडे मुंबईत हे दर 1721 रुपये इतके झाले असून कोलकाता व चेन्नईमध्ये हेच दर क्रमशः 1,870 आणि 1,971 रुपयांवर गेले आहेत.

तेल कंपन्यांनी घरगुती वापराच्या गॅस सिलेंडर दरात मात्र कोणतीही वाढ केलेली नाही. दिल्लीत घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरचे दर 1053 रुपये इतके असून मुंबई, कोलकाता आणि चेन्नईत हेच दर क्रमशः 1052.5 रुपये, 1079 रुपये व 1068.50 रुपयांवर स्थिर आहेत. तेल कंपन्यांनी सरत्या वर्षात म्हणजे 2022 सालच्या मार्चमध्ये घरगुती गॅस सिलेंडर दरात 50 रुपयांची वाढ केली होती. त्यानंतर मे महिन्यात 50 आणि 3.50 रुपये अशी दोनदा वाढ केली होती तर जुलैमध्ये आणखी एकदा 50 रुपयांची वाढ करण्यात आली होती.

हेही वाचा :

Back to top button