अर्थवृत्त्त : सोने चमकले, चांदी चकाकली; जाणून घ्या सोन्याची किंमती वाढण्याची कारणे | पुढारी

अर्थवृत्त्त : सोने चमकले, चांदी चकाकली; जाणून घ्या सोन्याची किंमती वाढण्याची कारणे

वर्षाच्या अखेरच्या दिवशी शनिवारी सोने आणि चांदीच्या भावात तेजी दिसून आली. या वर्षाच्या सुरवातीला सोन्याचे भाव दहा ग्रॅमला 48 हजार 279 होते. वर्ष संपताना ते 54, 867 झाले. गेल्या वर्षभरात सोन्याचे भाव दहा ग्रॅमला सुमारे 6588 रुपये इतके वाढले. चांदीच्या किंमतीतही गेल्या वर्षभरात तेजी दिसून आली. 2022 च्या सुरवातीला किलोला चांदीचा दर 62 हजार 35 रुपये इतका होता. वर्ष संपताना ते 68 हजार 92 रुपये इतका झाला. चांदीचे दरही सहा हजार 57 रुपये इतके किलोला वाढले. आर्थिक अस्थिरतेमुळे आरबीआयसह जगातील केंद्रीय बँकांनी सोन्याचा साठा वाढविला आहे. केंद्रीय सल्लागार समितीचे संचालक अजय केडिया यांनी सांगितले, की येत्या वर्षभरात सोने 64 हजारांच्याही पुढे जाऊ शकते, असा अंदाज त्यांनी वर्तविला आहे.

सोन्याची किंमती वाढण्याची कारणे

दिवाळीत ऑक्टोबरमध्ये डॉलरचा इंडेक्स 114 होता. तो आत्ता 104 वर आला आहे. यामुळे सोन्यासाठी जादा डॉलर मोजावे लागत होते.
जगभरातील केंद्रीय बँकांनी सुमारे 400 टन सोने खरेदी केली. चीनने 2019 नंतर पहिल्यांदा सोन्याचा साठा वाढविला. त्यांनी 32 टन सोने खरेदी केले.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत ऑगस्ट 2020 मध्ये आत्तापर्यंतचा सोन्याच्या दराचा उच्चांक नोंदला गेला. त्यावेळी सोने प्रती दहा ग्रॅमला 56 हजार 200 रुपये होते. आत्ता त्यापेक्षा सोन्याचा दर एक हजार 333 इतका कमी आहे.

Back to top button