Yearly Horoscope 2023 : आजची रास मेष : प्रगतीची पहाट | पुढारी

Yearly Horoscope 2023 : आजची रास मेष : प्रगतीची पहाट

होराभूषण : रघुवीर खटावकर

मेष रास ही राशी अग्नी तत्त्वाची असून त्यात अश्विनी (वायू तत्त्व),भरणी (अग्नी तत्त्व) कृतिका 1 चरण (अग्नी तत्त्व) ही नक्षत्रे आहेत. Yearly Horoscope 2023 या अग्नी तत्त्वाच्या एकाच राशीत अश्विनी हे देवगणी नक्षत्र (आकाश व अग्नी तत्त्वाच्या केतूचे) आहे. त्यामुळे या राशीत रवी हा उच्च फल देतो.

मेष राशी स्वामी मंगळ हा अग्नी तत्त्वाचाच असल्यामुळे स्वराशीत उत्तम फले देणारा आहे. ही पुरुष राशी असून राशी स्वामी मंगळ हाही पुरुष ग्रह आहे.

राशी स्वामी मंगळ सर्व ग्रहात बलवान ग्रह आहे. त्यामुळे या राशीत चंद्र असलेल्या मेष राशीच्या व्यक्ती ‘बेधडक दे धडक’ या वृत्तीच्या असतात. त्या आक्रमक असतात. रागावल्या तरी त्यांचा राग लवकर शांत होतो. सर्वांची संरक्षण करण्याची धमक यांच्यात असल्यामुळे या व्यक्ती धाडसाची आवश्यकता असलेल्या संरक्षक, पोलिस, अग्निशामक दल इत्यादी सर्व क्षेत्रात काम करताना आढळून येतात. प्रवासाची आवड असते.

या वर्षात हर्षल, राहू (20 नोव्हें. 2023 पर्यंत) हे मेष राशीतच आहेत. हर्षल हा अचानक घटना घडविणारा प्रखर बुद्धिमत्तेचा ग्रह आहे तर राहू (जल व वायू तत्त्वाचा ग्रह आहे.) यांच्या चांगल्या कल्पना सुद्धा इतरांना विक्षिप्तपणाच्या वाटतील,पण राहूमुळे महत्त्वाच्या वेळी गाफील रहाण्याची प्रवृत्ती दिसून येईल. एकदम टोकाचे निर्णय घेण्याच्या प्रवृत्तीमुळे नुकसान होण्याची शक्यता राहील. ही त्यांच्यासाठी सावधगिरीची सूचना राहील.

या मेेष राशी व्यक्तींचा भाग्यविधाता गुरू 21 एप्रिल रोजी यांच्याच राशीत येणार आहे. त्याच्यामुळे राहू राजयोगकारक फले देण्यास प्रवृत्ती होईल. हर्षलच्या विक्षिप्तपणामुळे हातातून सुटणार्‍या बाबींना काबूत ठेवण्याचे मार्ग यांना सापडतील. या योगामुळे नेहमीच्या प्रथा सोडून व्यक्तींनी वागले नाही तर चांगले परिणाम दिसून येतील; अन्यथा घर सोडून जवळच्या व्यक्तींपासून दूर जाण्याची दुर्बुद्धी होईल, पण आनंदी, आशावादी रहाल. विवाह जुळेल. समाजाभिमुख रहाल. सामाजिक दर्जा वाढेल. पर्यटनाची संधी लाभेल. परदेशगमनाचे योग तर वर्षभर चालू राहतील. हाच गुरू एखादा नवीन आजार, दीर्घकाळ टिकणारे दुखणे सुरू करू शकतो. आपल्या दिनचर्येत योगासने, प्राणायाम इत्यादींना जरूर स्थान द्या. पंचमेश रवी हा सुद्धा यांच्यासाठी फार महत्त्वाचा ग्रह राहील. रवी मेष राशीपासून तिसर्‍या (मिथुनेत जून-जुलै) राशीत, 6व्या स्थानी (कन्या-तूळ राशीत सप्टें. ऑक्टो.) व 10 व्या 11 व्या स्थानी (मकर कुंभेत जाने.-फेब्रु-मार्च) महिन्यात नेहमीच यश देणारा असतो. या काळात या व्यक्ती सृजनशील असतात, कमी श्रमात संधी मिळते व आपल्या कार्यक्षेत्रात चमकतात.

मेष राशी स्वामी मंगळ या वर्षात वृषभेत (12 मार्च पर्यंत) नंतर मिथुनेत (10 मे पर्यंत), कर्केत (30 जून पर्यंत), सिंहेत (18 ऑगष्टपर्यंत), कन्येत (3 ऑक्टो.पर्यंत) तूळेत (16 नोव्हेेंबरपर्यंत व नंतर वृश्चिकेत अनुक्रमे राशीला 2 रा, 3 रा, 4 था,5 वा, 6 वा, 7 वा, 8 वा राहील. मिथुन व कन्या राशीतील मंगळाचे भ्रमण उत्तम राहील. सुवर्ण प्राप्ती करून देणारे राहील, पण उतावळेपणा देईल. या काळात विरोध कमी राहील. आजारपण तुमच्यापासून दूर राहील. कर्केतील मंगळाच्या भ्रमणात पोटाचे विकार, काविळ, मित्राकडून फसवणूक असे अनुभव देईल.

शनीचा कुंभ राशी प्रवेश

17 जानेवारी 2023 हा शनी पुढील अडीच वर्षे मेष राशीच्या लाभात राहील. तरीसुद्धा तो काही प्रमाणात कष्ट देणारा राहील. विशेषत: वृद्ध व्यक्तींचे आरोग्य बिघडू शकते. तुमच्या राशीतील हर्षल, राहू, गुरू वर शनीची दृष्टी रहाणार आहे. घरातील व्यक्तींसाठी काही प्रमाणात त्याग करावयास लावणारी आहे. येथे शनी आपली कर्तव्ये कठोरपणे करायला लावतो, पण तुमची फसवणूक ही होऊ देत नाही. या शनीमुळे तुम्हाला कायमस्वरूपाची नोकरी, वैभव मिळेल. धनवृद्धी होऊन दर्जा वाढेल.

मंगळाच्या कर्केतील भ्रमणाच्या काळात मे-जून मध्ये प्रॉपटर्हीची कामे मार्गी लावू शकाल. विवाहवेदीवर चढण्यासाठी हे वर्षपूर्ण अनुकूल राहील. विवाहितांना संततीप्राप्ती होईल.विद्यार्थ्यांची लक्षणीय प्रगती होईल. रवीचे कर्क (जून-ऑगस्ट), वृश्चिक(नोव्हेंबर-डिसेंबर) व मीन (मार्च-एप्रिल) या राशीतील भ्रमणात अपेक्षित यश मिळणार नाही घरगृहस्थीच्या काळजीत रहाल. धंद्यात मंदीचे वातावरण राहील. किंवा स्पर्धा जाणवेल. शुक्राच्या जाने. 23 च्या मकर राशीतील भ्रमणात धंद्याकडे दुर्लक्ष झाल्यास नुकसान होऊ शकेल.

नेपच्यून 18 फेब्रु. 2023 रोजी पुढील 14 वर्षांसाठी मीन राशीत प्रवेश करणार आहे. तो मेष राशीराठी ताम्रपादाने प्रवेश करत असल्यामुळे श्री प्राप्ती (धन-विद्या-यश प्राप्ती) करून देणारा आहे. तो राशीच्या 12 व्या स्थानांत असल्यामुळे मधून मधून अनाकालनीय खर्च उद्भवतील. जाने. 2023 मध्ये नेपच्यून राशीला 11 वा आहे. या काळात आर्थिक प्रलोभनापासून दूर रहा. प्लुटो वर्षभर राशीच्या 10 व्या स्थानी असल्यामुळे धंदा-व्यवसायात एकदम टोकाचे चांगले वाईट वादळ अनुभवास येऊ शकतील. बुध ऑक्टो. 2023 च्या उतरार्धात भावनिक वादळ निर्माण करू शकेल. एकंदरीत हे वर्ष मागील वर्षापेक्षा खूपच चांगले जाणारे राहील. पुढील वर्र्षी येणार्‍या विकासाच्या वर्षाची हे वर्ष पहाट आहे हे समजायला काहीच हरकत नाही.

हेही वाचा :

Back to top button