कोरोना काळात संचारबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याच्या आरोपातून इसमाची सुटका | पुढारी

कोरोना काळात संचारबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याच्या आरोपातून इसमाची सुटका

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : कोरोना काळात संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करुन उघडपणे फिरल्याचा आरोप असलेल्या राजीव नावाच्या इसमाची अतिरिक्त महानगर दंडाधिकारी न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. आदेशाचे उल्लंघन केल्याचा आरोप ठेवत दिल्ली पोलिसांनी राजीवविरोधात फौजदारी गुन्हा दाखल केला होता. मात्र सरकारी पक्षाने ठोस पुरावे सादर केले नाहीत, असे सांगत न्यायालयाने त्याच्या सुटकेचे आदेश दिले.

पुरावे पुरेसे नाहीत तसेच त्याच्यात तांत्रिक त्रुटी दिसून येत असल्याची टिप्पणी न्यायालयाने आदेशात केली. मे 2021 च्या दरम्यान कोरोना काळात संबंधित इसमाने संचारबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याचे दिल्लीतील शालीमार बाग पोलिसांचे म्हणणे होते. राजीव हा ठोस कारणाशिवाय आझादपूर भाजीपाला बाजाराजवळ फिरत होता, असे पोलिसांनी म्हटले होते. पोलिस डायरीत संबंधित पोलिस भागात त्या भागात तैनात होता की नाही, याची माहिती मिळत नसल्याचे अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी नीती मिश्रा यांनी आदेशात नमूद केले आहे.

       हेही वाचलंत का ?

 

Back to top button