Man Ki Baat : आज ख्रिसमसला पीएम मोदी साधणार जनतेशी संवाद; ‘मन की बात’चा वर्षातील शेवटचा भाग  | पुढारी

Man Ki Baat : आज ख्रिसमसला पीएम मोदी साधणार जनतेशी संवाद; 'मन की बात'चा वर्षातील शेवटचा भाग 

पुढारी ऑनलाईन डेस्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी (25 डिसेंबर) आज ख्रिसमसनिमित्त ‘मन की बात’ (Mann Ki Baat) कार्यक्रमाद्वारे देशवासियांना संबोधित करणार आहेत. पंतप्रधान मोदींनी गेल्या आठवड्यात देशवासियांना त्यांच्या कल्पना पाठवण्यासाठी सांगितले होते. 2022 ची शेवटची मन की बात आज असणार आहे. या संदर्भात त्यांनी ट्विट करत म्हंटलं आहे की, “या कार्यक्रमाबद्दल तुमचे विचार ऐकण्यासाठी मी उत्सुक आहे. नमो अॅप, MyGov.in वर लिहा किंवा तुमचा संदेश 1800-11-7800 या क्रमांकावर रेकॉर्ड करा.” (आता रेकॉर्ड केले जाऊ शकत नाहीत)

Mann Ki Baat : 11 वाजता मन की बात 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मन की बात कार्यक्रम आज 25 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 11 वाजता प्रकाशित होईल. हा कार्यक्रम ऑल इंडिया रेडिओ आणि दूरदर्शनच्या संपूर्ण नेटवर्कवर, ऑल इंडिया रेडिओ न्यूज वेबसाइट आणि न्यूजोनियर मोबाइल अॅपवर प्रसारित केला जाईल. मन की बात कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी ज्या मुद्द्यांवर बोलावे, असे तुम्हाला वाटते त्या मुद्द्यांवर सूचना मागविण्यात आल्या होत्या. आता या ट्रोल-फ्री नंबरवर संदेश रेकॉर्ड केले जाऊ शकत नाहीत.

पंतप्रधान मोदी कोरोनावर बोलू शकतात

मीडिया रिपोर्ट्सनुसार, आज या कार्यक्रमाद्वारे पंतप्रधान देशवासियांशी कोरोनाबाबत काळजी घेण्यासंदर्भात बोलू शकतात. कोरोना अजून संपलेला नाही, असे आवाहन पंतप्रधान लोकांना करू शकतात. 

हेही वाचा

Back to top button