राजधानीत थंडीचा कडाका वाढला; वायू गुणवत्ता निर्देशांक अत्यंत खराब श्रेणीत

राजधानीत थंडीचा कडाका वाढला; वायू गुणवत्ता निर्देशांक अत्यंत खराब श्रेणीत

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : राजधानी दिल्लीसह राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील तापमानात घट झाल्याने थंडीचा कडाका वाढला आहे. दिल्लीसह आजूबाजूच्या राज्यांमध्ये त्यामुळे दाट घुक्यांची चादर  पसरली आहे. वाढती थंडी, धुक्यासह दिल्लीतील हवादेखील प्रदूषित झाली आहे. वायु गुणवत्तेत सात्याने घट होत आहे. एनसीआरचे किमान तापमान ६ अंश सेल्सियस नोंदवण्यात आले आहे. दिल्ली, नोएडा, गाझियाबाद, फरिदाबाद सह एनसीआरमधील इतर भागांमध्ये दाट घुके पसरले होते.

सोमवारी दिल्लीतील वायु गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) अत्यंत खराब श्रेणीत ४०७ नोंदवण्यात आला.यासह दिल्लीतील इतर भागातील एक्यूआय देखील अत्यंत खराब श्रेणीत नोंदवण्यात आला. अलीपूर मध्ये एक्यूआय ४३०, आनंद विहार ४५०, अशोक विहार ४२९, भवाना ४२०, मथुरा रोड ३२९, द्वारका ४०४, आयटीओ ४२०, नेहरू नगर ४५५ तसेच पडपडगंज मध्ये एक्यूआय ४३३ नोंदवण्यात आला.रविवारी दिल्लीतील किमान तापमानात २ अंश सेल्सियस ने घट नोंदवण्यात आली. हवामान खात्यानूसार हवेतील आर्द्रतेचे प्रमाण ८७ ते ६३ टक्के नोंदवण्यात आले.सोमवारी तापमान अनुक्रमे ६ आणि २४ अंश सेल्सियस राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणाच्या काही भागात तसेच उत्तर राजस्थानमध्ये थंडीच्या लाट येण्याची शक्यता आहे. तापमानात आणखी घट होण्याची शक्यता त्यामुळे वर्तवली जात आहे. दिल्लीत १८ डिसेंबरला किमान तापमान ६ अंश सेल्सियस नोंदवण्यात आले होते.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनूसार, दाट धुके पसरण्यास सुरूवात झाली आहे. पंरतु, वातावरण साफ असल्याने दिवसा चांगले उन्ह पडत आहे. हवा सुरू आहे पंरतु, सकाळी आणि संध्याकाळी थंडी पडत असल्याने वातावरणात गारवा आला आहे. थंडीच्या लाटेमुळे उत्तर भारतातील राज्यांमध्ये तापमानात तीन ते चार अंश सेल्सियसने घट होण्याची शक्यता आहे. धुक्यामुळे रस्त्यावरील वाहनांचा वेग मंदावला आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news