बेळगाव : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीकडून कर्नाटक सरकारच्या दडपशाहीचा निषेध

बेळगाव : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीकडून कर्नाटक सरकारच्या दडपशाहीचा निषेध

बेळगाव,पुढारी वृत्‍तसेवा : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने कर्नाटक सरकारने घेतलेल्या अधिवेशनाला विरोध करण्यासाठी आज वॅक्सिंग डेपो येथे महामेळावा आयोजित केला होता. पण लोकशाहीची मूल्ये पायदळी तुडवून परत एकदा मराठी माणसावर अन्याय करून होणारा महामेळावाला निर्बंध लावून समितीच्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आणि हा महामेळावा उध्वस्त करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

याचा निषेध म्हणून खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्याला आलेल्या पदाधिकाऱ्याने कर्नाटक सरकारचा निषेध केला. यावेळी खानापूर म. ए. समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

.हेही वाचा  

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news