Delhi Temperature : दिल्ली गारठली; सिमल्यापेक्षाही कमी तापमानाची नोंद | पुढारी

Delhi Temperature : दिल्ली गारठली; सिमल्यापेक्षाही कमी तापमानाची नोंद

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा: देशाची राजधानी दिल्लीसह उत्तर भारताचा पारा घसरू लागला असून, रविवारी दिल्लीतील किमान तापमान सहा अंश सेल्सिअस इतके कमी नोंदविले गेले आहे. ( Delhi Temperature ) सर्वसाधारण तापमानाच्या तुलनेत दिल्लीतील किमान तापमानात दोन अंश सेल्सिअसने घट झाली आहे.

हवामान खात्याच्या माहितीनुसार, सध्या दिल्लीतील तापमान हे हिमाचल प्रदेशातील सिमल्यापेक्षाही कमी आहे. ( Delhi Temperature )  अजून, दोन ते तीन दिवस दिल्लीत थंडीचा कडाका राहण्याची शक्यता आहे. सिमला येथे सध्या कमाल तापमान 18 अंश इतके तर किमान तापमान ७ ते ८ अंश सेल्सिअस इतके आहे.

दुसरीकडे दिल्लीतील कमाल तापमान २५ अंश सेल्सिअसच्या आसपास आहे. दरम्यान दिल्लीतील प्रदूषणस्थिती अजूनही खराब असून, वायू गुणवत्ता निर्देशांक तीनशेच्या आसपास आहे. येत्या काही दिवसांत प्रदूषणकारी धूळ व धुके वाढण्याचाही अंदाज हवामान विभागाकडू वर्तवण्यात आला आहे.

हेही वाचा :

Back to top button