मोठी बातमी : झोमॅटो देणार ३ टक्के कर्मचाऱ्यांना नारळ - Lay offs at Zomato | पुढारी

मोठी बातमी : झोमॅटो देणार ३ टक्के कर्मचाऱ्यांना नारळ - Lay offs at Zomato

मेटा, ट्विटर, अॅमेझॉननंतर झोमॅटोतही कर्मचारी कपात (Lay offs at Zomato)

पुढारी ऑनलाईन – फूड डिलिव्हरी अॅप झोमॅटोतून मोठ्या प्रमाणावर नोकरकपात केली जाणार आहे. या कंपनीतून 3 टक्के कर्मचाऱ्यांना लवकरच नारळ दिला जाणार असल्याची बातमी आहे. खर्चात कपात करून लवकरात लवकर नफ्यात येण्याचे आव्हान झोमॅटोपुढे आहे, त्यामुळ कर्मचारी कपात केली जाणार आहे. कंपनीतून यापूर्वीच १०० लोकांना कामावरून कमी करण्यात आले आहे. (Lay offs at Zomato)

गेल्या काही महिन्यात तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यातून मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात केली जात आहे. फेसबुकची मूळ कंपनी मेटा, अॅमेझॉन, ट्विटर अशा मोठ्या कंपन्यांनी कर्मचारी कपात केली आहे. भारतीय कंपन्यांपैकी बायजूसने ही मोठ्या संख्येने कर्मचारी कपात केली आहे.

द मनिकंट्रोल या वेबसाईटने झोमॅटोमधून कर्मचारी कपात केली जाणार असल्याची बातमी दिली आहे. काही दिवसांपूर्वी सीईओ दीपिंदर गोयल यांनी कर्मचाऱ्यांशी संवाद साधला होता, यामध्ये त्यांनी नोकर कपात केली जाणार असल्याची माहिती दिली होती.
कंपनीने दिलेल्या उत्तरात ही कपात नियमित स्वरूपाची असल्याचे म्हटले आहे. “कर्मचाऱ्यांच्या कामाचा नियमित आढावा घेतला जातो. यातून दरवर्षी ३ टक्के कर्मचारी कमी केले जातात, यामध्ये नवीन असे काही नाही,” असे कंपनीच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.

झोमॅटोचे सहसंस्थापक मोहित गुप्ता यांनी शुक्रवारी त्यांचा पदाचा राजीनामा दिला आहे. तसचे वरिष्ठ पदांवरील राहुल गांजून, सिद्धार्थ झेवर यांनीही कंपनीला रामराम केला आहे. त्यामुळे वरिष्ठ पातळीवरील स्थिरता हाही महत्त्वाचा मुद्दा बनला आहे.
झोमॅटोचा महसूल वाढला असला तरी कंपनी अजून तोट्यात आहे. या तिमाहीत कंपनीचा तोटा २५० कोटी रुपयांचा आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीला ४३४.९ कोटी रुपयांचा तोटा झाला होता.

हेही वाचा

Back to top button