काँग्रेसच्या काळात चीनने हजारो किलोमीटर जमीन भारताकडून बळकावली : गृहमंत्री अमित शहांचा गंभीर आरोप | पुढारी

काँग्रेसच्या काळात चीनने हजारो किलोमीटर जमीन भारताकडून बळकावली : गृहमंत्री अमित शहांचा गंभीर आरोप

पुढारी ऑनलाईन डेस्क : काँग्रेसने २००६-०७ मध्ये चिनी दूतावासाकडून संशोधनासाठी पैसे घेतले होते. काँग्रेसच्या काळात हजारो किलोमीटर जमीन भारताकडून बळकावली, राजीव गांधी फाऊंडेशनला चीनकडून १ कोटी ३५ लाख मिळाले होते, असे गंभीर आरोप गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेसवर केले आहेत. आज दिल्ली येथे त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

अरुणाचल प्रदेशातील तवांगमध्ये भारत-चीन सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीवरून संसदेत विरोधक सरकारला घेराव घालत आहेत. या मुद्द्यावर बोलताना गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली. चीनच्या धमकीनंतर २०११ मध्ये काँग्रेसने सीमेवरील बांधकाम थांबवले होते. २००६ मध्ये काँग्रेसचे सरकार असताना भारतात चीनच्या दुतावासाने अरूणाचल प्रदेशवर दावा केला होता. काँग्रेसच्या काळातच चीनने हजारो किलोमीटर जमीन भारताकडून बळकावली.

जवाहरलाल नेहरू यांच्या प्रेमाच्या कारणामुळे भारताच्या सुरक्षा परिषदेतील स्थायी सदस्यतेचा बळी गेला. प्रश्नसुचीत ५ नंबरचा प्रश्न राजीव गांधी फाउंडेशनचे FCRA रजिस्ट्रेशन रद्द करण्याचा विचारण्यात आला आहे. काँग्रेसच्या सदस्याकडूनच हा प्रश्न विचारण्यात आला आहे. राजू गांधी फाऊंडेशनला चीनी दुतावासाकडून १ कोटी ३५ लाख रूपये अनुदान मिळाले होते. तसेच राजीव गांधी फाऊंडेशनचे लायसन रद्द होण्यासाठी आणखी एक कारण होते. इस्लामिक रिसर्च फाउंडेशनच्या झाकीर नाईक यांच्याकडून ५० लाख रूपये घेतले होते. ते कशासाठी घेतले होते याचे काँग्रेसने स्पष्टीकरण द्यावे. हे भाजपचे सरकार आहे. जोपर्यंत भाजपची सत्ता आहे तोपर्यंत एक इंचही जमीन कुणी घेऊ शकणार नाही, असे शहा यांनी म्हटले आहे.

हेही वाचा :

Back to top button