India-China Clash : तवांगमधील भारत-चीन धुमश्चक्रीवर थोड्याच वेळात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत उत्तर देणार | पुढारी

India-China Clash : तवांगमधील भारत-चीन धुमश्चक्रीवर थोड्याच वेळात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत उत्तर देणार

पुढारी ऑनलाइन डेस्क : India-China Clash : अरुणाचल प्रदेशच्या तवंगमध्ये झालेल्या भारत-चीन लष्कराच्या धुमश्चक्रीनंतर विपक्षने या मुद्द्यावरून सरकारला चांगलेच लक्ष्य केले आहे. याबाबत रक्षा मंत्री राजनाथ सिंह संसदेच्या दोन्ही सभागृहात उत्तर देणार आहेत. तर विरोधी पक्षाने प्रधानमंत्री मोदींकडून यावर उत्तर मागितले आहे. विरोधी पक्षाच्या खासदारांनी सस्पेंशन ऑफ बिजनेस नोटीस दिली आहे.

दरम्यान, भारत-चीन लष्करात झालेल्या धुमश्चक्रीनंतर आज रक्षा मंत्री राजनाथ सिंह यांनी उच्चस्तरीय बैठक बोलावली होती. यामध्ये सीडीएस सह तीन्ही दलांच्या प्रमुखांनी सहभाग घेतला होता. दरम्यान या बैठकीत काय चर्चा झाली हे अद्याप समोर आलेले नाही.

India-China Clash : संसदेच्या दोन्ही सदनात राजनाथ सिंह देणार उत्तर

एएनआय ने सरकारी सूत्रांच्या हवाल्याने रक्षा मंत्री राजनाथ सिंह आज दुपारी 12 वाजता लोकसभेत तर दुपारी दोन वाजता राज्यसभेत भारत-चीन सैनिकांमधील चकमकीबाबतच्या मुद्द्यावर उत्तर देणार आहे.

India-China Clash : नेमके काय घडले होते सीमेवर

स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एसएसीवर चीनच्या पीपुल्स लिबरेशन आर्मीच्या सैनिकांनी जमावडा 9 डिसेंबरला पाहिला होता. त्यावेळी भारतीय सैनिकांनी चीनी सेनेला तेथून हटण्यासाठी बजावले. मात्र, त्यांनी नकार दिल्याने दोघांमध्ये झपड झाली. त्यानंतर भारत चीन दोन्ही सैनिक आपआपल्या टेंन्टमध्ये परतले. चीनकडून अचानक झालेल्या या हल्ल्याचे जोरदार उत्तर भारातीय सैनिकांनी दिले. यामध्ये भारताचे 20 सैनिक जखम्मी झाले. तर चीनच्या जखमी सैनिकांचा आकडा जवळपास दुपटीने अधिक होता असे सांगण्यात आले आहे. दरम्यान, आता संसदेत राजनाथ सिंह काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे ही वाचा :

India-China : भारत-चीन लष्करात तवांग सीमेवर धुमश्चक्री; ३०० वर चिन्यांना हुसकावले; ६ भारतीय जवान जखमी

इस्‍लामिक देशांच्‍या संघटनेवर भारताने ओढला ‘आसूड’, “दुर्दैवाने या संघटनेचे …”

Back to top button