राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी 

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्‍यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. शरद पवार यांच्या  सिल्वर ओक निवासस्थानी फोन करून "मुंबईत येऊन देशी कट्ट्याने जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे." या प्रकरणी    गावदेवी पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोमवारी ( दि. १२ )  राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांचा ८२ वा वाढदिवस झाला. आज  त्यांना  जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. एका अज्ञात व्यक्तीने शरद पवार  यांच्या  सिल्वर ओक निवासस्थानी फोन केला. मुंबईत येऊन जीवे मारण्याची धमकी दिली . फोन करणाऱ्या अज्ञात व्यक्तीने हिंदीमधून धमकी दिली आहे. अज्ञाताविरोधात गावदेवी पोलिस ठाण्यात गुन्‍हा दाखल झाला आहे.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news