Cyclone Mandos Update : ‘मंदोस’ चक्रीवादळ आज धडकणार; या ठिकाणी ऑरेंज अलर्ट   

Cyclone Mandos Update
Cyclone Mandos Update

पुढारी ऑनलाईन डेस्क :  'मंदोस' चक्रीवादळ आज (9 डिसेंबर) चेन्नईच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवण्यात आली आहे. तामिळनाडूमधील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आला आहे. (Cyclone Mandos Update) तर महाराष्ट्रातील काही भागातही या चक्रीवादळाचे सावट येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. वाचा सविस्तर बातमी.

तेरा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

बंगालच्या उपसागरात बुधवारी (दि. 7) सकाळी 'मंदोस' या चक्रीवादळाची निर्मिती झाली आहे. हे नाव संंयुक्त अरब राष्ट्राने दिले आहे. हे चक्रीवादळ आज शुक्रवारी (दि.९) चेन्नईच्या किनारपट्टीवर येण्याची शक्यता असल्याने या भागातील तेरा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट (Cyclone Mandos) देण्यात आला आहे. येत्या 48 तासांत हे वादळ उग्र रूप धारण करू शकते. पावसाचा धोका पाहता तेथे NDRF आणि SDRF च्या 400 जवानांचा समावेश असलेल्या 12 टीम तैनात करण्यात आल्या आहेत.

Cyclone Mandos Update : शाळांना सुट्टी

हवामान विभागाच्या अंदाजानुसार काही जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट सांगण्यात आला आहे. तर तामिळनाडूच्या 17 जिल्ह्यांमध्ये आज (शुक्रवार) शाळांना आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार दक्षिण-पश्चिम आखातावर चक्रीवादळ सरकत आहे. परिणामी कावेरी डेल्टा प्रदेशातील नागापट्टिनम आणि तंजावर तसेच चेन्नई आणि शेजारील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊसही पडू शकतो.

महाराष्ट्रात तुरळक भागांत हलका पाऊस

'मंदोस' चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रावर होण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळामुळे महाराष्ट्राकडे बाष्पयुक्त वारे येत असल्याने ढगाळ वातावरण तयार होऊन तुरळक भागांत हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रासह गुजरातलाही फटका बसणार आहे.  12, 13, 14 आणि 15 डिसेंबर रोजी महाराष्ट्रात, मध्य प्रदेश आणि गुजरात राज्यातील काही ठिकाणी  पावसाची शक्यता वर्तवली आहे. महाराष्ट्रात कोकणसह मुंबई, मराठवाडा, पुणे विदर्भ येथे पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news