work from home | मोठी बातमी! आयटी कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’साठी डिसेंबर २०२३ पर्यंत परवानगी | पुढारी

work from home | मोठी बातमी! आयटी कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम'साठी डिसेंबर २०२३ पर्यंत परवानगी

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : वर्क फ्रॉम होम (work from home) करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. वाणिज्य मंत्रालयाने विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) युनिट्समध्ये असलेल्या आयटी/ आयटीईएस (IT/ITeS) कंपन्यांच्या १०० टक्के कर्मचाऱ्यांना काही अटींवर ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत वर्क फ्रॉम होम करण्याची परवानगी दिली आहे. याबाबतची अधिसूचना वाणिज्य मंत्रालयाने जारी केली आहे.

मंत्रालयाने अधिसूचनेमध्ये म्हटले आहे की, “एखादे युनिट त्यांच्या कर्मचार्‍यांना घरून किंवा SEZ क्षेत्राबाहेरून कोणत्याही ठिकाणी काम करण्याची परवानगी देऊ शकते.” याआधी, SEZ मध्ये जास्तीत जास्त एक वर्ष वर्क फ्रॉम होमची परवानगी होती आणि एकूण कर्मचार्‍यांपैकी कमाल ५० टक्क्यांपर्यंत वाढवण्यासाठी मूभा होती.

वाणिज्य मंत्रालयाच्या नवीन अधिसूचनेनुसार, SEZ युनिट मालकांना संबंधित झोनच्या विकास आयुक्तांना कळवावे लागेल आणि मंजुरीच्या पत्रानुसार ते त्यांच्या ठिकाणांवरून काम सुरु ठेवतील. भविष्यात वर्क फ्रॉम होम करू इच्छिणारे युनिट्स वर्क फ्रॉम होम सुरू करण्याच्या तारखेला किंवा त्यापूर्वी मेल करून कळवू शकतात.

युनिटला वर्क फ्रॉम होम किंवा SEZ बाहेर कोणत्याही ठिकाणाहून काम करण्याची परवानगी असलेल्या कर्मचार्‍यांची यादी सादर करण्याची गरज नाही. तरीही त्यांना ही यादी अंतर्गत ठेवावी लागेल. जे तात्पुरते कामावर येण्यास सक्षम नाहीत, अशा कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याची परवानगी आहे. वाणिज्य मंत्रालयाने पुढे म्हटले आहे की, संबंधित कर्मचाऱ्यांना घरून काम (work from home) करण्यासाठी लॅपटॉप, डेस्कटॉप किंवा इतर उपकरणे पुरवावी लागतील.

हे ही वाचा :

Back to top button