

पुढारी ऑनलाइन डेस्क : (BSF) राजस्थानमध्ये करणपूरला लागून असलेल्या आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानच्या बाजूने भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करणा-या एका व्यक्तीला सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) जवानांनी गोळ्या घालून ठार केले. ही घटना श्री गंगानगरच्या हरमुख चेक पोस्टजवळील 14 एस गावात सोमवारी रात्री उशिरा घडली, अशी माहिती बीएसएफच्या (BSF) वरिष्ठ अधिका-याने दिली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, (BSF) : राजस्थानमधील श्री गंगानगर शहरातील हरमुख चेकपोस्ट जवळील आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानच्या बाजूने एकाने भारताच्या हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला. घुसखोर व्यक्ती भारताच्या बाजूकडील कुंपणाकडे जाऊ लागला. यावेळी पेट्रोलिंगवर असलेल्या बीएसएफच्या जवानांनी त्याला पाहिले आणि त्याला पुढे न जाण्याचा इशारा दिला.
(BSF) मात्र, घुसखोराने त्याकडे दूर्लक्ष केले. त्यामुळे सैन्याने या घुसखोरावर गोळीबार करून निष्प्रभ केले आणि त्याचा प्रयत्न हाणून पाडला. दरम्यान या भागाला वेढा घातला गेला आहे आणि शोध मोहीम सुरू ठेवली. अशी माहिती अधिका-याने दिली.
(BSF) दरम्यान, त्याचा मृतदेह सापडला असून तो त्यांनी पाकिस्तानी रेंजर्सकडे सोपवला आहे. पाकिस्तानने अद्याप त्याचा मृतदेह स्वीकारलेला नाही. ते त्याच्या पडताळणी करीत आहे. जर त्यांनी मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला तर प्रोटोकॉलनुसार अंत्यसंस्कार केले जातील. मात्र, आम्ही पाकिस्तानकडून अधिकृत पुष्टी किंवा नकाराची वाट पाहत आहोत, अशी माहिती अधिका-यांनी दिली.
हे ही वाचा :