Bhopal Wedding : विना आमंत्रण लग्नात जेवणे पडले महागात; धुवावी लागली भांडी (VIDEO) | पुढारी

Bhopal Wedding : विना आमंत्रण लग्नात जेवणे पडले महागात; धुवावी लागली भांडी (VIDEO)

भूपाळ; पुढारी ऑनलाईन : आपल्याकडे ‘बेगाने शादी में अब्दुला दिवाना’ अशी म्हण चांगलीच प्रचलीत आहे. या म्हणी प्रमाणे विना आमंत्रण एखाद्या लग्नात घूसून जेवण करणे चांगलेच महागात पडले आहे. लग्नात न बोलावता जेवायला गेलेल्या एमबीएच्या विद्यार्थ्याला लोकांनी पकडून त्याच्याकडून ताट धुवून घेतले. एवढेच नाही तर त्याचा व्हिडिओ करुन तो सर्वत्र व्हायरल केला आहे. इंटरनेटवर सध्या हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ मध्य प्रदेशातील भोपाळचा असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, याप्रकरणी अद्याप कोणाकडूनही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. (Bhopal Wedding)

मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधील एक व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये स्वतःला एमबीएचा विद्यार्थी म्हणवून घेणारा तरुण लग्नात न बोलावता जेवायला आला होता. पण, तरुणीच्या बाजूच्या लोकांना त्याच्यावर संशय आला, त्यामुळे तो तरुण पकडला गेला. (Bhopal Wedding)

त्या तरुणाला विचारण्यात आले की तुम्हाला कोणाच्या बाजूने निमंत्रित करण्यात आले आहे. यावर तरुण काही बोलू शकला नाही आणि त्याची चोरी पकडली गेली. यानंतर लोकांनी त्याला ताट धुण्यास भाग पाडले आणि त्याचा अपमान केला. याप्रकरणी अद्याप कोणत्याही पक्षाने पोलिसांत गुन्हा दाखल केलेला नाही. पोलीसही या संदर्भात कोणतीही माहिती मिळाले नसल्याचे सांगत आहेत. (Bhopal Wedding)

हा व्हायरल झालेला व्हिडिओ भोपाळमधील एका लग्नातील असल्याचे सांगितले जात आहे. हा तरुण लग्नात न बोलावता जेवायला आला होता. लोकांच्या नजरा शांतपणे मेजवानीचा आनंद लुटणाऱ्या या तरुणावर पडल्या. तरुणाला विचारण्यात आले की त्याला कोणाच्या वतीने बोलावण्यात आले होते. या प्रश्नाचे उत्तर त्या तरुणाला देता आले नाही. लग्नाला न बोलावता आलेल्या तरुणावर लोकांचा राग अनावर झाला. यानंतर तरुणाला पकडून त्याला उष्ट्या प्लेट्स धुवून काढायला लावल्या. यावेळी त्याचे नाव व पत्ता विचारण्या आले आणि त्या तरुणाचा प्लेट्स धुतानाचा व्हिडिओ बनवून व्हायरल करण्यात आला.

या प्रकरणी पोलिस तक्रार केली नाही (Bhopal Wedding)

हा व्हायरल व्हिडिओ समोर आल्यानंतर कोणत्याही बाजूने गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचवेळी आपल्याशी अन्यायकारक वागणूक दिल्याचे पीडित तरुणाचे म्हणणे आहे.


अधिक वाचा :

Back to top button