हेअर ट्रान्सप्लांटच्या शस्त्रक्रियेनंतर तरुणाचा मृत्यू : दिल्लीत चौघांवर गुन्हे – Video | पुढारी

हेअर ट्रान्सप्लांटच्या शस्त्रक्रियेनंतर तरुणाचा मृत्यू : दिल्लीत चौघांवर गुन्हे - Video

हेअर ट्रान्सप्लांटच्या शस्त्रक्रियेनंतर तरुणाचा मृत्यू : दिल्लीत चौघांवर गुन्हे

पुढारी ऑनलाईन – हेअर ट्रान्सप्लांटच्या शस्त्रक्रियेनंतर दिल्लीत एका युवकाचा मृत्यू झाला आहे. या युवकाचे नाव अथर रशिद (वय ३०) असे आहे. शस्त्रक्रियनेनंतर अथरच्या डोक्यात पस झाला, त्यातून त्याच्या डोक्याला सूज आली, अशी माहिती त्याची आई आसिया बेगम यांनी दिली आहे.

“माझ्या मुलाची किडनी निकामी झाली, त्यानंतर इतरही अवयवांच्या व्याधी सुरू झाल्या. मुलाचा मृत्यू अत्यंत वेदनादायीरीत्या झाला,” असे तिच्या आईने सांगितले.

आसिया बेगम यांनी संबंधित क्लिनिक विरोधात पोलिसांत तक्रार दिली असून यात चार जणांना ताब्यात घेण्यात आले आहे, असे याहू न्यूजने बातमीत म्हटले आहे. या घटनेनंतर बोगस डॉक्टर आणि अप्रशिक्षित व्यक्तींकडून होत असलेल्या हेअर ट्रान्सप्लांटच्या शस्त्रक्रियांचा मुद्दा चर्चेत आला आहे.

हेअर ट्रान्सप्लांटची शस्त्रक्रिया करताना डोक्याच्या मागील भागातील हेअर फॉलिकल्स काढून ते टक्कल पडलेल्या भागात शस्त्रक्रियेने बसवले जातात. असोसिएशन ऑफ हेअर रिस्टोरेशन सर्जनची ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. मयांक सिंग म्हणाले, “मी महिन्याला जवळपास १५ शस्त्रक्रिया करतो. टक्कल पडल्याने लग्न ठरत नाही, किंवा व्यक्तिमत्व रुबाबदार दिसत नाही अशा कारणांसाठी हेअर ट्रान्सप्लांटची शस्त्रक्रिया केली जाते यात २५ ते ३५ वयोगटातील तरुणांची संख्या जास्त आहे.”

सिंग म्हणाले, “अशा शस्त्रक्रियांचा खर्च साडेतीन लाख रुपयेपर्यंत जातो. पण अप्रशिक्षित कथित तज्ज्ञ अशा शस्त्रक्रिया काही हजारांत करून देतात. ही शस्त्रक्रिया किरकोळ नाही, हे आपण समजून घेतले पाहिजेत. या शस्त्रक्रियेसाठी ६ ते ८ तास जातात, शिवाय रुग्णाला भूल द्यावी लागते. जर ही शस्त्रक्रिया तज्ज्ञांनी केली नाही तर त्यात गंभीर तृटी राहू शकतात.”

हेही वाचा

Back to top button