पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांना भाजपमध्ये मोठी जबाबदारी | पुढारी

पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांना भाजपमध्ये मोठी जबाबदारी

नवी दिल्ली: पुढारी वृत्तसेवा : पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग तसेच याच राज्याचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या सुनील जाखड यांची भारतीय जनता पक्षाने आपल्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर सदस्य म्हणून वर्णी लावली आहे. दरम्यान काँग्रेसच्या प्रवक्तेपदाचा राजीनामा देऊन भाजपवासी झालेल्या जयवीर शेरगील यांची भाजपने राष्ट्रीय प्रवक्ते म्हणून नियुक्ती केली आहे.

राष्ट्रीय कार्यकारिणीवर सदस्य म्हणून ज्यांना संधी मिळाली आहे, त्यात अमरिंदर, जाखड यांच्याबरोबरच उत्तर प्रदेशचे भाजपचे माजी अध्यक्ष स्वतंत्रदेव सिंग यांचा समावेश आहे. याशिवाय कार्यकारिणीवर कायम निमंत्रित म्हणून उत्तराखंड भाजपचे माजी अध्यक्ष मदन कौशिक, छत्तीसगड भाजपचे माजी अध्यक्ष विष्णूदेव सहाय, राणा गुरमीत सिंग सोधी, मनोरंजन कालिया, अमनजोत कौर रामूवालिया यांनाही संधी देण्यात आली आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button