Mainpuri Bypoll : 'सपा'तील काका-पुतण्‍यामधील मतभेदावर 'पडदा', अखिलेश-शिवपाल आले एका व्‍यासपीठावर | पुढारी

Mainpuri Bypoll : 'सपा'तील काका-पुतण्‍यामधील मतभेदावर 'पडदा', अखिलेश-शिवपाल आले एका व्‍यासपीठावर

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : समाजवादी पार्टीचे अध्‍यक्ष अखिलेश यादव आणि प्रगतिशील समाजवादी पार्टीचे अध्‍यक्ष शिवपाल सिंह यादव हे आज ( दि. २० ) मैनपुरीमध्‍ये एका व्‍यासपीठावर आले. आमच्‍यामध्‍ये कोणतेही मतभेद नाहीत, आमच्‍या नात्‍यामधील दुरावा आता संपुष्‍टात आला आहे, अशी घोषणा त्‍यांनी केली. या घोषणेमुळे समाजवादी पार्टीमधील काका-पुतण्‍या मतभेदावर पडदा पडल्‍याची चर्चा उत्तर प्रदेशच्‍या राजकारणात होत आहे.

मैनपूरमधील सभेत बोलताना अखिलेश यादव म्‍हणाले की, आमचे काका-पुतण्‍याचे नाते नेहमीच अत्‍यंत निकटचे राहिले आहे. राजकीय दृष्‍ट्या आमच्‍यामध्‍ये अनेकवेळा मतभेद झाले ही वस्‍तुस्‍थिती आहे. आम्‍ही राजकीयदृष्‍ट्या वेगळणो होता.  होते आता आमच्‍यातील सर्व मतभेद संपले असून नात्‍यांमधील दुरावाही संपला आहे.

शिवपाल सिंह यादव म्‍हणाला की, मैनपुरी लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. नेताजी मुलायमसिंह यादव यांची ही निवडणूक आहे. सर्वांनी एकत्र यावे ही जनतेच म्‍हटले होते. माझी विनंती आहे की, या पोटनिवडणुकीत मतदारांनी डिंपल यादव यांना निवडून द्‍यावे. ही खर्‍या अर्थाने मुलायमसिंह यादव यांना खरी श्रद्धांजली असेल.

हेही वाचा 

 

 

 

 

 

Back to top button