Tesla Cars : टेस्ला कंपनीने 3 लाख कार परत मागविल्या, वाचा कारण

Tesla Cars : टेस्ला कंपनीने 3 लाख कार परत मागविल्या, वाचा कारण

पुढारी ऑनलाईन डेस्क : जगभरात प्रगत वैशिष्ट्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या अमेरिकन (Tesla Cars) कार कंपनी टेस्लाने अमेरिकेतील लाखो कार परत मागवल्या आहेत. कारच्या टेल लाईटमध्ये समस्या येत आहे, अशी माहिती मिळाल्यानंतर सर्व गाड्या परत मागवण्यात आल्या आहेत. सुमारे 3 लाख 21 हजार कार परत मागवल्या आहेत. कंपनीला कारच्या टेललाइट्समध्ये समस्यांबद्दल ग्राहकांकडून सतत तक्रारी येत होत्या. ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस परदेशी बाजारपेठेत विक्री झालेल्या अनेक कारच्या टेल लाइट्स काम करत नसल्याचा अहवाल कंपनीला मिळाला होता.

सुरुवातीच्या चाचणीत अनेक कारमध्ये (Tesla Cars) टेल लाइट सदोष असल्याचे आढळून आले आहे. काही कारणास्तव लाईट अधूनमधून काम करत नाही. दरम्यान, कारची सविस्तर तपासणी केल्यावरच याबाबतची संपूर्ण माहिती उपलब्ध होईल. कंपनीतील सूत्रांनुसार सॉफ्टवेअर अपडेट्स ऑनलाइन रिलीझ करत आहे. त्यामुळे ही समस्या दूर होईल. परत मागवलेल्या कारमध्ये 2020 मॉडेल Y SUV आणि 2023 मॉडेल 3 सेडानचा समावेश आहे. कंपनीने एकूण 3 लाख 21 हजार 628 कार परत मागविल्या आहेत.

टेस्लाच्या कार अमेरिकेबाहेरही लोकप्रिय आहेत. सर्वोत्कृष्ट आणि प्रगत वैशिष्ट्यांसह इलेक्ट्रिक कार तयार करण्यासाठी कंपनीने जगभरात ओळख निर्माण केली आहे. कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये मॉडेल S, X, Y आणि मॉडेल 3 सारख्या कारचा समावेश आहे. या कारमध्ये ऑटो पायलट मोड, कीलेस ऍक्सेस, लक्झरी इंटीरियर तसेच उत्कृष्ट बॅटरी रेंज आदी वैशिष्ट्ये आहेत.

हेही वाचलंत का ? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news