Suryakumar Yadav Century: ‘सूर्या’ने पाडला धावांचा पाऊस! किवी गोलंदाजांची धुलाई करत ठोकले तुफनी शतक (Video) | पुढारी

Suryakumar Yadav Century: ‘सूर्या’ने पाडला धावांचा पाऊस! किवी गोलंदाजांची धुलाई करत ठोकले तुफनी शतक (Video)

पुढारी ऑनलाईन डेस्क : Suryakumar Yadav Century : न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात भारतीय फलंदाज सूर्यकुमार यादव जबरदस्त फॉर्म सुरूच राहिला. त्याने आजच्या सामन्यात किवी गोलंदाजांची अक्षरश: धो धो धुलाई केली. ऋषभ पंत बाद होऊन सलामीची जोडी फुटल्यानंतर सूर्या तिसऱ्या क्रमांकावर मैदानात उतरला. त्यानंतर त्यने न्यूझीलंडची सर्वोत्तम गोलंदाजीची फोडून काढत धावांचा पाऊस पाडला आणि टी 20 कारकिर्दीतील दुसरे शतक झळकावले.

सूर्यकुमारची 51 चेंडूत 111 धावांची नाबाद खेळी (Suryakumar Yadav Century)

या सामन्यात सूर्यकुमार यादवने 51 चेंडूत नाबाद 111 धावा केल्या आणि त्यादरम्यान त्याने 7 षटकार आणि 11 चौकार लगावले. त्याचा स्ट्राइक रेट 217.65 होता आणि हे त्याच्या टी 20 कारकिर्दीतील दुसरे शतक ठरले. या खेळीच्या जोरावर भारताने 20 षटकांत 6 गडी गमावून 191 धावा केल्या.

शेवटच्या पाच षटकांमध्ये सूर्यकुमार यादवने कहर केला आणि मैदानाच्या चौफेर फटकेवाजी केली. या वादळी खेळीच्या जोरावर त्याने 32 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले होते, तर त्याचे शतक 49 चेंडूत पूर्ण केले. तसेच, डावाच्या शेवटी त्याने 51 चेंडूत 111 धावा केल्या. त्याने आपल्या डावातील शेवटच्या 19 चेंडूंमध्ये 61 धावा वसूल केल्या.

भारतासाठी टी 20 मधील सर्वोच्च धावसंख्या (Suryakumar Yadav Century)

• 122- विराट कोहली
• 118- रोहित शर्मा
• 117- सूर्यकुमार यादव
• 111- सूर्यकुमार यादव
• 111- रोहित शर्मा

भारत-न्यूझीलंड टी 20 मधील एका फलंदाजाची सर्वोच्च धावसंख्या

• सूर्यकुमार यादव – 111
• कॉलिन मुनरो – 109

2022 मध्ये सर्वाधिक धावा (T20 आंतरराष्ट्रीय)

सूर्यकुमार यादव – 30 सामने, 1151 धावा, 47.95 सरासरी, 2 शतके, 9 अर्धशतके, 105 चौकार, 67 षटकार
मोहम्मद रिझवान – 25 सामने, 996 धावा, 45.27 सरासरी, 10 अर्धशतक, 78 चौकार, 22 षटकार

Back to top button