International Mens Day : पुरुष दिन साजरा करणे का आहे गरजेचे? | पुढारी

International Mens Day : पुरुष दिन साजरा करणे का आहे गरजेचे?

पुढारी ऑनलाईन डेस्क : तुम्हाला महिला दिन माहित आहे पण तुम्हाला माहित आहे का पुरुष दिनही साजरा केला जातो. आज १९ नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय पुरुष दिन. जवळपास ८० देशांमध्ये हा दिन साजरा केला जातो.  हा दिन पुरुषांचे शारीरिक आरोग्य आणि मानसिक आरोग्य, त्यांच्या समस्या, लैंगिक समानता आदी विषयांवर लोकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी हा दिन साजरा केला जातो. वाचा हा दिन का (International Mens Day) साजरा केला जातो, कधीपासून साजरा केला जातो.

कधी झाली पुरुष दिनाला सुरुवात

हा दिन साजरा करण्यचा प्रस्ताव पहिल्यांदा थॉमस ऑस्टर यांनी ७ फेब्रुवारी १९९२ रोजी मांडला. त्याअगोदर १९९१ ला ही हा प्रस्ताव मांडला होता. त्यांनतर त्रिनिदाद आणि टोबॅगो येथील वेस्ट इंडीज विद्यापीठातील इतिहासाचे प्राध्यापक डॉ. जेरोम तेलकसिंग यांनी १९९९ मध्ये आपण आपल्या सभोवताल पुरुष हा खंबीर, रागीट, न रडणारा, धाडसी, हिंसक आहे असचं बहुतांश वेळा गृहीत धरतो. पुस्तके, चित्रपटात ही असाच पाहिला जातो. अशीच काहीशी परिभाषा बघतो. हीच परिभाषा बदलण्यासाठी हा दिन साजरा करण्यास सुरुवात केली. त्यांनी हा दिन आपल्या वडिलांच्या जन्मदिनादिवशी साजरा करण्यास सुरुवात केली.

International Mens Day
International Mens Day

International Mens Day : असा साजरा केला जातो

आंतरराष्ट्रीय स्तरावर पुरुष दिन साजरा केला जातो. पुरुषांच्या संबंधित असणाऱ्या समस्या, त्यांचे हक्क, आरोग्य आदी विषयावर कार्यक्रम घेतले जातात. संमेलन आयोजित केले जातात. जागरुकता निर्माण केली जाते. पण तुम्हाला साजरा करायचा असेल तर तुम्ही तुमच्या घरातील पुरुषांना समजून घ्या. त्याच्या समस्यांवर चर्चा करा. त्याच्याशी संवाद साधा.

International Mens Day : २०२२ थीम

दरवर्षी आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाची एक थीम ठरवली जाते. २०२२ ची थीम अशी आहे की, पुरुष आणि मुलांना मदत करणे (Helping Men and Boys). या थीमचा उद्देश असा आहे की, जागतिक स्तरावर मुले आणि पुरुषांना आरोग्य, कल्याण या अंगाने चर्चा करून कृतीधोरण करणे. महिला आणि पुरुषांमधील चांगले संबंध ही २०२१ च्या पुरुष दिनाची थीम होती. (Better relations between men and women), अशी होती.

भारतातील पुरुष दिन

जगभरात १९९२ ला पुरुष दिन साजरा करण्यास सुरुवात झाली. पण आपल्या भारतात पुरुष दिनाला सुरुवात ही  २००७ मध्ये १९ नोव्हेंबर रोजी सुरुवात झाली. पण तुम्हाला माहित आहे का? २००७ मध्ये हैदराबाद येथिल लेखिका उमा चल्ला यांनी भारतात पुरुष दिन साजरा करायला सुरुवात केली.

हेही वाचा

Back to top button