डायबेटिजमुळे पुरुषांच्‍या गुप्‍तांगाला होवू शकतो संसर्ग : 'आयएडीव्‍हीएल' परिषदेत तज्‍ज्ञांचे मत | पुढारी

डायबेटिजमुळे पुरुषांच्‍या गुप्‍तांगाला होवू शकतो संसर्ग : 'आयएडीव्‍हीएल' परिषदेत तज्‍ज्ञांचे मत

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : पुरुषांनी गुप्‍तांगाला संसर्ग झाल्‍यास तत्‍काळ डॉक्‍टरांचा सल्‍ला घ्‍यावा, याबाबत कोणताही संकोच करु नये, कारण हा संसर्ग डायबेटिजमुळे (मधुमेह) होवू शकतो. याकडे दुर्लक्ष केल्‍यास लैंगिक आणि लघवीच्‍या समस्‍या उद्भवू शकतात, असे लखनौ येथे आयोजित इंडियन असोसिएशन ऑफ डर्मेटोलॉजिस्ट, वेनेरिओलॉजिस्ट आणि लेप्रोलॉजिस्ट (IADVL) परिषेदत तज्‍ज्ञांनी स्‍पष्‍ट केल्‍याचे वृत्त ‘टाइम्‍स ऑफ इंडिया’ने दिले आहे.

या परिषदेचे आयोजन डॉ. अमित मदान यांनी सांगितले की, “पुरुषांच्‍या जननेंद्रियाच्‍या पुढील त्‍वचेचा संसर्ग झाल्‍याचे रुग्‍ण आम्‍ही अनेकदा पाहतो. हा संसर्ग हा बुरशीजन्‍य संक्रमण आणि नागीण विकारामुळे होते; परंतु आपल्‍याकडे संकोच आणि सामाजिक दबावामुळे रुग्‍ण याबाबत बोलत नाहीत. अशा रुग्‍णांना बहुतांशवेळा प्री-डायबेटिज किंवा मधुमेहामुळे हा संसर्ग झाल्‍याचे आढळले आहे.”

यावेळी डॉ. नीरज पांडे म्‍हणाले की, थायरॉईडचा विकार आणि डायबेडिजमुळे बोटांची टोके, वक्र नखे आणि नखांच्‍या वरची जाड त्‍वचा पाहावी. त्‍यांना त्रास होत असेल तर तत्‍काळ डॉक्‍टरांचा सल्‍ला घ्‍यावा. तसेच त्‍वचारोगावरील उपचार सलग घेत रहावे कारण ते पुन्‍हा पुन्‍हा उद्भवतात. रुग्‍णांनी अर्धवट उपचार केले तर औषधांचाही प्रतिसाद मिळत नाही.

पुरुषांनी आपल्‍या जननेंद्रियाच्‍या पुढील त्‍वचेचा संसर्ग झाल्‍यास यामध्‍ये कोणताही संकोच न बाळगता डॉक्‍टरांचा सल्‍ला
घ्‍यावा. कारण डायबेटिजमुळेही असा संसर्ग होण्‍याचा धोका वाढतो, असे निरीक्षणही डॉक्‍टरांनी या वेळी नोंदवले.

हेही वाचा :

 

Back to top button