Share Market Vedanta Dividend : ‘या’ कंपनीचे शेअर होल्डर होणार मालामाल; मिळणार वर्षातील तिसरा डिव्हिडंट
पुढारी ऑनलाईन डेस्क : मंदीच्या वातावरणात सध्या गुंतवणूकदारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. वेदांता (Vedanta) या लोह उत्पादन क्षेत्रातील कंपनीने चालू आर्थिक वर्षातील तिसरा लाभांश (Dividend) जाहीर केला आहे. कंपनीच्या संचालक मंडळ बैठकीमध्ये याबाबत पुढील आठवड्यापर्यंत मंजुरी मिळेल. कंपनीकडून गुरुवारी (दि. 17) देण्यात आलेल्या या अहवालामध्ये ही माहिती देण्यात आली. कंपनीने यापूर्वी मे 2022 मध्ये प्रति शेअर 31.5 रुपये आणि जुलैमध्ये 19.5 रुपये प्रति शेअर लाभांश दिला आहे. त्यानंतर आता तिसऱ्यांदा हा लाभांश देणार असल्याची माहिती दिली आहे.
Share Market Vedanta Dividend : भागधारकांची होणार मालामाल
एक्सचेंज फाइलिंगमध्ये, कंपनीने म्हटले आहे की FY23 साठी इक्विटी शेअर्सवरील अंतरिम लाभांश 22 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या बोर्डाच्या बैठकीत मंजूर केला जाईल. कंपनीकडून भागधारकांना वर्षातील हा तिसरा लाभांश असेल. वेदांत कंपनी तिसऱ्या लाभांशासाठी रेकॉर्ड डेटही लकरच जाहीर करेल. आता गुंतवणूकदारांना मंगळवारी होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीला उपस्थित राहावे लागणार आहे. वेदांताने पुढे असे देखील सांगितले आहे की, जर हा लाभांश पात्र भागधारकांसाठी रेकॉर्डमधील तारखेला मंजूर झाला, तर याची रेकॉर्ड तारीख 30 नोव्हेंबर म्हणजेच बुधवारी हा लाभांश मिळू शकते.
उपकंपनीही देत आहे लाभांश
वेदांता कंपनीचा शेअर गुरुवारी (दि. 17) बीएसईवर 1.5 टक्क्यांच्या वाढीसह ३०७ रुपयांवर बंद झाला. यापूर्वी, वेदांताची उपकंपनी हिंदुस्तान झिंक (Hind Zinc Dividend Date) ने देखील FY23 साठी दुसरा लाभांश जाहीर केला होता. या अंतर्गत भागधारकांना प्रति शेअर 15.5 रुपये लाभांश मिळेल. म्हणजेच, गुंतवणूकदारांना प्रति शेअर 2 रुपये दर्शनी मूल्यावर 775 टक्के लाभांश मिळेल.
हेही वाचा
- Certificate Of Coverage : परदेशात नोकरीसाठी जात आहात…मग या प्रमाणपत्राची माहिती करुन घ्या
- New Two Seater Car : आता येणार फक्त 'दोन सीटर'कार; दुचाकीला करा बाय बाय
- Sai Tamhankar : हाय दिवाळीचा कंदील की मंडपाची झालर ❤️; सई झाली ट्रोल
- Kantara Ott Release Date : प्रतिक्षा संपली ! 'या' दिवशी ऋषक्ष शेट्टीचा 'कांतारा' येणार OTT वर प्रेक्षकांच्या भेटीला
- INDvsNZ T20 : भारत-न्यूझीलंड पहिला टी 20 सामना रद्द होण्याची शक्यता
- Amazon कडून कर्मचारी कपात, १० हजार कर्मचाऱ्यांना पाठवला ई-मेल

