New Two Seater Car : आता येणार फक्त 'दोन सीटर'कार; दुचाकीला करा बाय बाय | पुढारी

New Two Seater Car : आता येणार फक्त 'दोन सीटर'कार; दुचाकीला करा बाय बाय

पुढारी ऑनलाईन डेस्क : इलेक्ट्रिक मोबिलिटीमध्ये गेल्या दशकभरात प्रचंड वाढ झाली आहे. ही वाढ फक्त विक्रीच्या बाबतीत झाली नाही तर, इलेक्ट्रिक वाहनांशी संबंधित तंत्रज्ञानामध्ये (EVs) देखील विशिष्ट प्रकारे विकसित झाले आहे. दुचाकी आणि चारचाकी या दोन्ही सेगमेंटमध्ये अलिकडच्या काळात बॅटरीवर चालणाऱ्या तंत्रज्ञानाचा अवलंब मोठ्या प्रमाणात केलेला दिसून येतो. पुण्यातील एका कंपनी नवे वाहन आता बाजारात आणत आहे. एक छोटी स्टार्टअप कंपनी आता फक्त दोन माणसांची कार बनवत आहे. या नव्या स्टार्टअपमुळे आता दुचाकीला बाईकला लवकरच बाय बाय म्हणावे लागणार आहे. (New Two Seater Car)

अलीकडच्या काळात दुचाकी वाहनांच्या वापरामध्ये मोठी वाढ झाली आहे. मात्र चारचाकीसारखे केबिन आणि सीटला आरामात टेकून बसण्यासारखे फिचर हे दोन आसनी वाहनांमध्ये पहायला मिळत नाही. त्याचबरोबर शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीमुळे चारचाकी वाहने उभी करणे देखील मोठी समस्या आहे. आता ही चिंता दूर करण्यासाठी, पुणे येथील ‘वायवे मोबिलिटी’ नावाच्या संस्थेने असेच एक खास असे मॉडेल तयार केले आहे. ज्यामध्ये दोन आसनी बैठक व्यवस्था असेल, चारचाकी सारखे केबीन असेल, त्याचबरोबर जागा देखील कमी व्यापेल. या नव्या कारसारख्या दोन आसनी गाडीची चर्चा सध्या जोरात आहे. ईवा असे या कारचे नाव आहे. (New Two Seater Car)

Vayve Mobility Eva

अशी गाडी बनवण्यामागील संकल्पना

वायवे ही कंपनी ईवा ही एक लहान दोन सीटर इलेक्ट्रिक कार बनवत आहे. ज्यामध्ये एका लहान मुलासह दोन प्रौढांना बसण्याची क्षमता ठेवण्यात आली आहे. अतिवृष्टी, उच्च तापमान, प्रदूषण आणि आवाज यासारख्या पर्यावरणीय दृष्ट्या परिणामकारक परिस्थितींमुळे दुचाकी वाहने शहरी लोकांसाठी दैनंदिन वापरामुळे अपायकारक ठरत आहेत.

या वाहनाबद्दल अधिक माहिती

याविषयीची सविस्तर माहिती देताना, वायवे मोबिलिटीचे सीईओ सौरभ मेहता म्हणाले, “इवाची रेंज 250 किमी+ असेल, ज्यासाठी आठवड्यातून फक्त एक किंवा दोनदा चार्जिंग करावे लागेल, तुमच्याकडे उपलब्ध असलेल्या 15A इलेक्ट्रिकल सॉकेटचा वापर करून चार तासांत ही कार चार्ज होईल.”

Vayve Mobility Eva

कारचे डिझाईन

  • अरुंद बॉडी असलेले 1×3 मीटर असे या कारचे कॉन्फिगरेशन आहे. यामुळे ट्रॅफिकमधून गाडी चालवणे सोपे होते आणि पार्किंग देखील सुलभ होते.
  • कारची 20 किमी/kWh इतकी क्षमता आहे. तसेच यासाठी लागणारी ऊर्जा मॉड्युलर बॅटरी पॅकमधून वापरली जाते. ज्यामध्ये लिक्विड कूलिंग सेटअप आहे.
  • Eva कार DC कनेक्शनला फास्ट चार्जिंग होते. 1 तासात 80% चार्ज करू शकते.
  • या कारमध्ये पॅनोरॅमिक सनरूफ असलेले छत दिलेले आहे.
  • ईवा ही भारतातील पहिली सौरऊर्जेवर चालणारी इलेक्ट्रिक कार बनेल.

शहरातील प्रवाशांच्या दैनंदिन वापरातील ९५ % गरजा भागवणारी दुचाकी. या गाडीला २-सीटर कार सादर करून आम्ही नागरिकांना आगळेवेगळे असे नवे मॉडेल देत आहोत.
– वायवे मोबिलिटीचे सीईओ नीलेश बजाज

हेही वाचा

Back to top button