Kantara Ott Release Date : प्रतिक्षा संपली ! ‘या’ दिवशी ऋषक्ष शेट्टीचा ‘कांतारा’ येणार OTT वर प्रेक्षकांच्या भेटीला | पुढारी

Kantara Ott Release Date : प्रतिक्षा संपली ! ‘या’ दिवशी ऋषक्ष शेट्टीचा ‘कांतारा’ येणार OTT वर प्रेक्षकांच्या भेटीला

पुढारी ऑनलाईन डेस्क : कांतारा बॉक्स ऑफिसवर चांगला व्यवसाय करत आहे. ऋषभ शेट्टीचा हा चित्रपट प्रदर्शित होऊन दीड महिन्याहून अधिक काळ लोटला असला तरी चित्रपटगृहांमध्ये अजूनही हा चित्रपट गाजत आहे. भारतातील सर्व भाषांमध्ये या चित्रपटाने आधीच 300 कोटींचा आकडा पार केला आहे, तर हा चित्रपट जगभरातील 400 कोटी क्लबमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहे. कांतारा लवकरच ओटीटीवर प्रदर्शित होणार असल्याची बातमी खूप दिवसांपासून येत होती. चित्रपटगृहांमध्ये चित्रपटाला मिळत असलेल्या प्रतिसादामुळे निर्माते OTT प्लॅटफॉर्मवर चित्रपट प्रदर्शित करण्यास विलंब करत होते, परंतु आता चित्रपटाची OTT रिलीजची तारीख समोर आली आहे. (Kantara Ott Release Date)

‘कांतारा’च्या ओटीटी रिलीजमुळे वाढली उत्कंठा (Kantara Ott Release Date)

थिएटरमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर आता कांतारा लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. आधी निर्माते हा चित्रपट ४ नोव्हेंबरला प्रदर्शित करणार होते, पण नंतर त्यांनी ओटीटी रिलीज डेट पुढे ढकलली. चाहते सोशल मीडियावर चित्रपटाच्या ओटीटी तारखांबद्दल सतत ट्विट करत आहेत. वृत्तानुसार, ऋषभ शेट्टी दिग्दर्शित कंतारा हा चित्रपट 24 नोव्हेंबर रोजी OTT प्लॅटफॉर्म Amazon Prime Video वर प्रदर्शित होणार आहे. काही लोकांचे असेही म्हणणे आहे की हा चित्रपट डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होईल. तथापि, अद्याप चित्रपटाच्या ओटीटी रिलीजबद्दल निर्मात्यांनी कोणतीही अधिकृत माहिती शेअर केलेली नाही.

सोशल मीडियावर चाहते ‘कांतारा’बद्दल सतत ट्विट करत आहेत

कांताराच्या रिलीजच्या तारखेच्या घोषणेने सोशल मीडियावर चाहत्यांची उत्सुकता द्विगुणित झाली आहे. OTT प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट पाहण्यासाठी लोक आतुरतेने वाट पाहत आहेत. मल्याळम रिव्ह्यूने ट्विट केले की, ‘मोस्ट अवेटेड कांतारा 24 नोव्हेंबरला OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज होत आहे. तमिळ ओटीटी एक्सप्रेसनेही चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेबाबत ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये सांगण्यात आले की, कांतारा 24 नोव्हेंबरला OTT प्लॅटफॉर्मवर प्रीमियर होईल. हा चित्रपट कन्नड, तेलगू, तामिळ, हिंदी आणि मल्याळम भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. (Kantara Ott Release Date)


अधिक वाचा :

Back to top button