

पुढारी ऑनलाईन डेस्क : सोने कितीही महाग झाले तरीही भारतीयांमधील सोने खरेदीचा ट्रेंड संपणार नाही. भारतात सोने हा फक्त एक धातू नसून, ते वर्षानुवर्षे जपलेले एक भावनिक नाते आहे. त्यामुळेच भारतीयांच्या परंपरेत सोन्याचे स्थान मजबूत आहे. प्रत्येक घराघरातील स्त्रीची गुंतवणूक ही सोन्यावरच जास्त असते. प्रत्येक कुंटुंबाच्या सर्वात मोठ्या खरेदीमधील यादीतील प्रमुख घटक म्हणजे सोने आहे. हे सगळं खरं आहे की सोनं खूप महत्त्वाचे आहे, पण या सोन्याविषयीच्या सरकारने घालून दिलेल्या काही नियम माहित आहे का? एखादा व्यक्ती घरामध्ये किती सोने ठेऊ शकतो? याबाबत काही मर्यादा आहेत का? घरी सोने ठेवले असेल तर त्यावर कर भरावा लागतो का ? यासारख्या प्रश्नांचा आढावा या बातमीतून घेण्यात आला आहे. जाणून घ्या याबाबत सर्व माहिती. (Gold Rule)
एक व्यक्ती त्याच्या जवळ किती सोने ठेऊ शकतो, यासाठी CBDT नुसार (Central Board of Direct Taxes) काही नियम आहेत.
खरतर या मर्यादेपेक्षाही ज्यादा सोने जवळ ठेवता येते, पण त्यासाठी ठोस कारण असणे गरजेचे आहे. म्हणजे सोने वडिलोपार्जित ठेवा आहे का? याची माहिती द्यावी लागते.कर भरता का याची माहिती द्यावी लागते.
जर एखाद्या व्यक्तीच्या उत्पन्नातून किंवा एखाद्याच्या शेतीत मिळालेल्या उत्पन्नातून सोने खरेदी केले असेल, तर त्यावर कोणताही कर आकारला जाणार नाही. याशिवाय घराच्या खर्चातून बचत करून सोने खरेदी केले असेल किंवा वारसाहक्काने सोने मिळाले असेल तरीसुद्धा त्यावर कर भरावा लागणार नाही. मात्र वारशाने मिळालेले सोने कोठून आले हे याची चौकशी केली जाते. हे सोने कुठून आले, ते कोणत्या उत्पन्नातून विकत घेतले आहे, याची माहिती देणे बंधनकारक आहे.
हेही वाचा