T20 World Cup : पाकिस्‍तानच्या सेमीफायनल सामन्याऐवजी ‘या’ मिस्ट्रीगर्लची चर्चा जास्त

T20 World Cup : पाकिस्‍तानच्या सेमीफायनल सामन्याऐवजी ‘या’ मिस्ट्रीगर्लची चर्चा जास्त
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : टी-२० वर्ल्डकप (T20 World Cup) क्रिकेट स्पर्धेत पाकिस्‍तानने न्‍यूझीलंडविरुद्‍धचा पहिला सेमी फायनल सामना जिंकला आणि अंतिम फेरीत प्रवेश केला. या सामन्या दरम्यान एका पाकिस्तानी महिला चाहतीचा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या फोटोने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

टी-२० वर्ल्ड कपच्या पाकिस्‍तान विरुद्‍ध न्‍यूझीलंड दरम्यान पाकिस्तानचा जयजयकार करणारी ती मुलगी कोण? जी पॅव्हेलियनमधूनच कधी फ्लाईंग किस देताना दिसली तर कधी हात हलवून पाकिस्तानी संघाला प्रोत्साहन देताना दिसली. त्यामुळे कॅमेरावाले वारंवार त्या मुलीवर लक्ष केंद्रित करताना दिसत होते.

आता त्या मुलीचे नाव समाेर आले आहे. तिचे नाव नताशा असे आहे. ती पाकिस्तान क्रिकेट टीमची 'जबरा फॅन' आहे. ती मूळची पाकिस्तानी आहे. मात्र, तिचा जन्म ऑस्ट्रेलियात झाला असून तिथेच ती मोठी झाली. नताशा सध्या मेलबर्नमध्ये राहते.

या पाकिस्तानी मुलीच्या इंस्टाग्रामच्या पेजवर तिने ऑस्ट्रेलियन पंजाबी असे लिहिले आहे. पाकिस्तान आणि न्यूझीलंड सामना सुरू झाल्यानंतर या महिलाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

इन्स्टाग्रामवर नताशाची लोकप्रियता खूप वाढली आहे. हे फोटो व्हायरल होण्यापुर्वी तिचे १,५०० फॉलोअर्स होते आणि पाकिस्‍तानच्या सेमी फायनलनंतर ३५ हजारांहून अधिक फॉलोअर्स झाले आहेत. आता तिने तिचे इन्स्टाग्राम अकाउंट प्रायव्हेट केले आहे.

नताशाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तिच्या नावाने अनेक बनावट अकाऊंट तयार करून पोस्ट करण्यात आल्या आहेत. नताशाच्या या बनावट ट्विटर अकाऊंटने काही तासांतच हजारो फॉलोअर्स जमा केले आहेत. या सगळ्यामुळे व्यथित झालेल्या नताशाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ प्रसिद्ध केला, ज्यामध्ये तिने तिचा खरा आयडी उघड केला. तसेच लोकांना तिच्या फेक आयडीची तक्रार करण्याचे आवाहन केले. (T20 World Cup)

हेही वाचा…

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news