The Vaccine War : ११ भाषांमध्ये रिलीज होणार विवेक अग्निहोत्रींचा नवा चित्रपट | पुढारी

The Vaccine War : ११ भाषांमध्ये रिलीज होणार विवेक अग्निहोत्रींचा नवा चित्रपट

पुढारी ऑनलाईन डेस्क : ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी त्यांच्या पुढील प्रोजेक्टची घोषणा केली आहे. या चित्रपटाचे नाव ‘द व्हॅक्सिन वॉर’. (The Vaccine War) विवेक अग्निहोत्रींनी चित्रपटाचे पहिले पोस्टर शेअर करताना या प्रोजेक्टबद्दल सांगितले आहे. (The Vaccine War)

विवेक अग्निहोत्रींनी पोस्टर केले शेअर

पोस्टरमध्ये लसीची एक बॉटल असल्याचे दिसून येते, ज्यावर ‘द व्हॅक्सिन वॉर’ लिहिलेले आहे. यासोबतच ही कथाही सत्य घटनेवर आधारित असल्याचे विवेक अग्निहोत्री यांनी म्‍हटलं आहे. ११ भाषांमध्ये प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे शूटिंग लवकरच सुरू होणार आहे. मात्र त्याआधी त्यांना कलाकारांचा विचार करावा लागणार आहे. पोस्टरमध्ये लिहिले आहे, “एक अशी लढाई जी तुम्ही लढली होती, परंतु तुम्हाला त्याबद्दल माहिती नाही. आणि तीच लढाई तुम्ही जिंकली आहे.”

या चित्रपटाची निर्मिती पल्लवी जोशी करणार आहे. विवेक अग्निहोत्री यांच्या त्‍या पत्नी आहेत. ‘द काश्मीर फाईल्स’ची निर्मिती त्यांनी हाताळली हाेती. या चित्रपटातही त्‍यांनी अभिनय केला हाोता. ‘द कश्मीर फाईल्स’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. त्याने अनेक विक्रम आपल्या नावावर केले होते. केवळ १००-२०० कोटीच नाही तर यापेक्षा जास्त कमाई करून हा वर्षातील पहिला सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला हाोता. लॉकडाऊननंतर, विवेक अग्निहोत्रीच्या चित्रपटाप्रमाणे कोणत्याही चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली नाही. ज्यांची कास्टिंगही फार मोठी नव्हती. अनुपम खेर आणि मिथुन चक्रवर्ती यांनी चित्रपटात लाईमलाईटमध्ये होते.

‘द व्हॅक्सिन वॉर’ या चित्रपटाची घोषणा करताना, विवेक अग्निहोत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले की, “घोषणा: तुमच्यासमोर, मी ‘द व्हॅक्सिन वॉर’ घेऊन येत आहे. एका लढ्याची एक उत्तम कथा जी तुम्हाला व्हॉट इंडियाबद्दल माहिती नव्हती. (ANNOUNCEMENT: Presenting ‘THE VACCINE WAR’ – an incredible true story of a war that you didn’t know India fought. And won with its science, courage & great Indian values. It will release on Independence Day, 2023. In 11 languages. Please bless us. #TheVaccineWar)

आणखी एका ट्विटमध्ये विवेक यांनी म्हटलं आहे- ”For the first time ever an Indian film will release in 11 Indian languages. At @i_ambuddha & @AAArtsOfficial. it’s our humble initiative to help integrate Indian film industry as one. #BharatKaApnaCinema”

हेही वाचा :

Back to top button